Saturday, February 28, 2026

ऋतुगंध



मनात माझ्या अत्तर
अज्ञात ऋतूगंध
तुझ्या आभास कुपीचा
हा कसला मर्मबंध?

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com





जळला



झाड रडे बाई !
त्याचा मोहर् गळला 
ऋतू असा त्याचा
भर चैत्रात जळला 

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com





वेदनेचे कुळ



मी जपतो आहे येथे
तुझ्या वेदनेचे कुळ 
झाड कधी का त्यागते 
स्वअस्तित्वाचे मुळ 


₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com





अस्ताच्या वाटे




आला भरास चांदवा
सखी निजेपार
चांदण्याच्या पापणीला 
प्रतिक्षेचा भार

एकएकला चांदवा
तम एकट्याने काटे
जातो गुमान बापुडा
अस्ताच्या वाटे

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com






अज्ञात




मी वाहतो आहे क्रुस 
आणी तीक्ष्ण खिळे 
माझ्या क्षमावस्त्रास स्पर्शन्या
अज्ञात पाप तळमळे !

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



Friday, February 27, 2026

दगडी लेणे



अबोध मौन दाटते
जणू दगडी लेणे
तळे पाहते आभाळाचे 
सृष्टीवर पाखर होणे 

विजन लकेरत पक्षी
ऋतूवशेष सोडून जाती
देह धारतो स्तब्धता
मनी फुलव्याची माती

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com




परिपाठ...




घासून तीक्ष्ण तय्यार
क्रुसाचे तुझे खिळे
व्हावेच लागेल इथे
मग प्रेषित बळेबळे !

हवा कशाला येथे
नदीस घोटीव घाट
नसे ध्यास मुक्तीचा
तुटे आत्म्याचा परिपाठ!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व
www.prataprachana.blogspot.com






Wednesday, February 18, 2026

सूघड महाराष्ट्राचा धनी



प्रभो! निधड्या छातीने तू
वारे  गुलामीचे रोखले...
हे! सूघड महाराष्ट्राच्या धनी
तू शिल्प स्वराज्याचे रेखले!

शिवरायांना मानाचा त्रिवार मुजरा!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व
www.prataprachana.blogspot.com








Saturday, February 14, 2026

न कळे !


बदलत ऋतू पुढे निघतो 
स्थिर असतात झाडे
झेलत बसतात ऋतूरंग
जणू पाढ्यामागून पाढे

झाडा बोल बदलाचा 
खोल असता त्याची मुळे 
ऋतूगुंग स्वतःच्या रंगी
त्यास स्थित्यंतर न कळे !

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com






Sunday, February 8, 2026

जगरहाटी



जगरहाटी थोर
प्रेम प्रतिक्षेचे धनी
स्वप्न असू दे माझे
खोल एकल्या मनी

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com

सूलाह



चलो एक सूलाह करे हम
तूम नफरत करो,मै इश्क। 

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



धरोहर



सूनो ,तुम्हारी यादो की विरासत देख
मेरा दिल विश्व धरोहर स्थल बन सकता है।

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com





सुंदर घाव



जो प्रेम धुंदीत जखमी
जग त्यास कलंदर म्हणते
आणी इबादत त्याची 
घावांना सुंदर म्हणते

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



शिशिराचा मैत्र


कशास ही 
ख्यालीखूशाली
घेवून येतो चैत्र 

आणी जगरहाटी
होवून जातो हळूवार 
शिशिराचा मैत्र 


₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com


सहेलाता




मै शब्दो के सहारे
सहलाता हूं दिल।
कोई दिल नही 
सहलाता मूझे।

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



खुपते



निष्कारण किती तूटावे
पाहून फुलांचे मरणे
त्यांच्या देठतळातून 
हृदयास लाभले झुरणे 

गंध तयांचा शिल्लक 
माती स्मरण जपते
असे तसेच आठवांचे 
अंतरात काही खुपते.....

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com


नको



नको काढू माझ्या
सखे!कवितेचा माग
चांदण्याच्या अंतराची
शांत संयत ही आग

कशी दिसेल तूला?
माझ्या कवितेची छाया
मूक सागरतळातली 
ही भरतीची माया

नको शोधू सखे
माझ्या कवितेचा रंग
आळवणी भेटतसे
हा तसा पांडूरंग!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com




प्रघात



शांत कोसळतो
अंगणी पारिजात
निःशब्द तूटण्याचे
हे नित्य प्रघात....

गंध येण्या भूईला
देतो काळजाचा ठेवा
हस-या फुलांना
का निर्माल्याचा हेवा?


₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व
www.prataprachana.blogspot.com

Thursday, February 5, 2026

झेललेली आग



नको करू बाई !
काजळीचा राग 
वातींनी निमूट ही 
झेललेली आग!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



मोग-याचे मौन



सोड मोग-याचे मौन
दे शब्दगंधाचे सूवास
पायवाटेस माझ्या
रूनझूनाचा हव्यास

फूलसड्याच्या पावली
दे झुळूकी हाकारे
शिशिरास पहा येथे
आले चैत्राचे पुकारे

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व
www.prataprachana.blogspot.com










Monday, February 2, 2026

तोडून...?



गोकुळ निघाले मथुरा
अनाथ झाल्या गायी
राधा हृदय चालले
कृष्ण दिशेने पायी

येईल परतून कान्हा
देईल हाक हासरी?
की थेट वृंदावनी मूक्ती
तोडून प्राणप्रिय बासरी?

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com




आभास सृष्टी



सांज तळ्यावर येते
तिथे संध्यार्थ तारा
अज्ञात पायरवातही
अंधार घुटमळणारा 

कोण चकाकी सांडे
जणू चकाके चांदी
दूर दिशेला राऊळी 
व्याकुळ अभंग नांदी

नको दिलासा खोटा
अंधार उतरतो पृष्ठी
रंग तमाचा एक खरा तो
आभास रंगीत सृष्टी !

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



अस्तगिरीवर



निळ्या जांभळ्या अत्तरवेळी
सूनसान कविता दाटे
देह फुलांचे स्वर्ग गाठती 
निर्माल्याच्या वाटे 

अस्तगिरीवर सांज उतरते
रवि धिम्याने विरतो
सांजमिठीची आस प्रकाशा
अनवाणी मूक झुरतो!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



सहजासहजी



छिलून घे ना तू ही
पारंबीचे गाणे
वडास ध्यानी येईल 
बहराचे येणे जाणे

माघ पहा ना शिशिरी!
पानांना अपार छळतो
झाडांना चैत्र असा का
सहजा सहजी कळतो?

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com

लख्ख



तटापारचे दिसते
डोळे करता बंद
लख्ख आभास येथे
वाती असता मंद

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com


मुक्तीसंगर!

तूझ्या ओंजळीने भिमा तू आम्हा दिलास सागर महाडाच्या तळ्यातून  तू चेतवला जागर! तूझ्या ओंजळीचे आजही आम्ही पितो रे पाणी पिढ्या हूरूपाने गाती तूझ...