स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस
भाग 10 : स्वप्ननाची पाऊलवाट रेखताना.....!!!
बारावीच्या नंतर बि.ए. ची सुरूवात झाली. राज्यशास्त्र , लोकप्रशासन व इंग्रजी साहित्य हे विषय मी घेतले. वर्ष सुरू झाले. आणी मी नुकताच डि एड न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मला MPSC साठी प्रयत्न करणे गरजेचे होते. मला माझा निर्णय चुकु द्यायचा नव्हता. मला माझं आयुष्य गुलाबासारखं फुलवता येईल की नाही माहित नव्हतं पण भर वैशाख वणव्यात फुलणा-या गुलमोहरा सारखा मी नक्कीच त्याला जुळवणार होतो. मी शिकायला सुरूवात केली....आणी मी दुसरे करू तरी काय शकत होतो!
जुने मित्र निघून गेले, नविन मित्र मिळाले. वर्ष सुरू झालं तसा अभ्यास ही सुरू झाला. घेतलेले विषय सखोल शिकवले जात असत.पण हवे ते सापडत नव्हते. जिव कासावीस होत रहायचा. MPSC चा अभ्यास करायचा होता. काय करायचे सुचत नव्हते. सकाळी गावावरून निघायचे, काॅलेजला यायचे, शिकवलेले समजुन घ्यायचे. 2.00 वा. काॅलेज सुटायचे. पण बारावीची सवय होती. आणी गावात लवकर जाऊन करण्यासाठी काही नव्हते. ना गावात कुठली सुविधा ना वातावरण. सगळ्या खेड्यासारखे हे ही एक गाव, जिथे शेती, मजुरी किंवा रिकामटेकडेपणा या शिवाय चौथा पर्याय नव्हता. आणी ओढीने घराकडे जायला ना शेती होती ना धंदा. सोबत करता येईल असे मित्र ही गावात नव्हते. तसेच काॅलेज सुटल्यानंतर टाईमपास करत फिरायला खिशात पैसा तरी हवा , पण तो ही नसल्याने एकमेव चांगला आणी सुसह्यय पर्याय होता तो म्हणजे काॅलेजची लाएब्रेरी...आणी मी तिथे बसायला सुरूवात केली. मी तिथे बसत होतो आणि झपाटून वाचत होतो. पण त्याला ना दशा होती ना दिशा....पण । प्रयत्नांती परमेश्वर । म्हणतात...
मी काही तरी वाचतो, जास्त वेळ बसतो हे सिनीयर्सच्या दोन मुलांनी पाहिले. व ते माझ्या आसपास बसु लागले. एक होते प्रकाश मस्के व दुसरे होते तोडकर. तेही असेच तगमगणारे व झगडणारे होते. त्यांनी मला काय करतोस म्हणून विचारले? मी त्यांना खुप अदबीने सांगितले की मी एमपीएससीची तयारी करण्यासाठी वाचत आहे. त्यावर त्यांनी मला सांगितले की, आम्हाला पण काहीतरी चांगले करून दाखवायचे आहे. आपण मिळून अभ्यास करू. मला खुप आनंद झाला कारण मला एमपीएससीच्या नावाने चिडवणारे खुपजण होते पण कोणी तरी त्याला गांभीर्याने घेतले होते. मस्के हे बाभळगाव चे रहिवासी, दररोज ते माझ्यासारखेच अपडाऊन करणारे. तर तोडकर हे लातुरमधेच रहायचे. आम्ही तिघांनीही खुप भाराऊन आणी गांभीर्याने ठरवून टाकले की खुप अभ्यास करायचा.पण हे असे होते की, आम्ही गावाला जायचे पक्कं केलं पण कोणत्या आणी कसे? हे मात्र माहिती नव्हतं...पण प्रत्यक्षात कृतीला सुरूवात झाली होती...मला खुप हुरूप आला होता..कसा आणी किती अभ्यास करावा याचेच पिसे मला लागले होते. आम्ही विस्कळीत का होईना पण खुपच अभ्यास करत होतो. मस्के आणी मी खेड्यातले असल्याने एकमेकांशी ट्युनिंगने राहत होतो. ते ही दुपारचा डबा आणायचे. मग मी ही डबा न्यायचो. आम्ही काॅलेज सुटल्यानंतर जो आणी जसा असेल तो डबा खायचो. आणी अभ्यास करायचो. काही दिवसांनी काॅलेजच्या नविन इमारतीचे काम सुरू झाले. आणी लायब्ररीच्या गर्दीत वाढ झाल्याने आम्ही तिघांनी ठरवले की वेगळ्या ठिकाणी अभ्यास करू. आणी आजही डोळ्यांसमोर ते दिवस येतात...आठवले तरी पोटात कालवा कालव होते..आम्ही शांत वेळ मिळेल म्हणून त्या बांधकामाचं काम सुरू असलेल्या इमारतीत कोणाला कळणार नाही अशा पध्दतीने अभ्यासाला बसू लागलो...जणू काही आम्ही आयुष्याचं बांधकाम काढलं होतं....
मी एकाचवेळी अनेक भूमिकेत होतो. रेग्युलर काॅलेज मधे रेग्युलर विद्यार्थी, भरपूर मित्र मैत्रिणी. आणी ते सगळे घरी गेले की एमपीएससीचा अभ्यास करणारा विद्यार्थी, मित्रासाठी भांडणारा मुलगा, एनएसएस मधे सक्रिय सहभाग,आणी स्नेहसंमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रमात लक्षणीय व बक्षिस मिळेपर्यंत सहभाग.पण हे सगळं चाललं होतं एका "आएडेंटिटी क्रायसीस" साठी ! मला माझी ओळख निर्माण करायची होती. सर्व सिमा तोडायच्या होत्या. लांघायची होती ही आयुष्यातील अंतरे! मी जवळपास सगळंच करत होतो. पण पुर्णत्वाचा साधा आभासही होत नव्हता. फक्त एक होतं मात्र! मी इतरा सारखा नाही हे मला कळायला सुरूवात झाली होती. माझे हे दोन्ही सिनीयर्स आणी मी अभ्यासा सोबतच अत्यंत भावनिकतेने भविष्या बद्दल बोलायचो. त्यामुळे झगडण्याची जिद्द वाढली. आणी स्वप्न पेरून जर त्यांची नीट मशागत केली तर ते मुळ धरतातच !!!! याचा आलेला पहिला प्रत्यय म्हणजे शाहू काॅलेज जे महाराष्ट्रालाच नाही तर पुर्ण देशाला ज्याने मेरिट, मेडिकल व इंजिनियरींग साठीचा "शाहू पॅटर्न " , "लातूर पॅटर्न " दिला त्या महाविद्यालयास नावारुपाला आणणारे आदरणीय प्राचार्य अनिरुद्ध जाधव सर यांची नेहमीच एक खंत असायची की, आपण महाराष्ट्राला दर वर्षी शेकड्याने मेरिटचे विद्यार्थी देतो. पण आपण आज पावेतो स्पर्धा परीक्षा क्षेत्रात काहीच करू शकत नाही, या साठी त्यांनी काॅलेज मधे नव्याने रूजू झालेल्या प्राध्यापकांना घेवून महाविद्यालयातच " स्पर्धा परीक्षा" विषयक वर्ग प्रथमच सुरू केले!!! त्यांचा हेतू अत्यंत प्रामाणिक होता...मी एमपीएससी करायला सुरूवात (पण तशी ती फक्त भावनिकच होती हे नंतर कळले) केली आणी त्याचवेळी व वर्षी काॅलेजने हे क्लास सुरू केले....शुभशकूनच होता हा!!!!!
मी माझ्या सिनियर सह त्या वर्गास बसू लागलो. तेथे इच्छुक विद्यार्थी एकत्र आल्याने अजून हिंमत आली. अनिरुद्ध, मकरंद, निर्भय जाधव, प्रदिप राऊत , मनिषा (asst. Comm. Vat),असे काही सिरीयस वर्गमित्र तेथे भेटले. ते ही क्लासला यायचे. आम्ही सगळे काॅलेजचेच असल्याने आम्हाला सकाळी शिकवणारे प्राध्यापकवृंदच सायंकाळी शिकवायचे. पण महाविद्यालयीन विषय आणी एमपीएससीचे विषय यात साम्य असले तरी अॅप्रोच भिन्न असतो. महाविद्यालयात इतिहास शिकणे आणि एमपीएससी साठी इतिहास तयार करणे यात मोठा फरक असतो. हे समजत नव्हते. सगळेच अनअनुभवी पण हेतु मात्र खुप उदात्त!! आम्ही शिकत होतो. पण अपुर्णत्वाची रूखरूख येथे होतीच.पण एकट्याने दिशाहीन अभ्यास करण्यापेक्षा सामूहिक काहीतरी भरीव करण्याचा हा प्रयत्न ही आश्वासक होता...कमीत कमी या प्रयत्नांमुळे इच्छुक विद्यार्थ्यांचा संपर्क झाला. भलेही तो काॅलेजचा एक आदर्शवत उपक्रम होता. पण सर्वोत्तमचा ध्यास असणा-या जाधव सरांना आणी आम्हा विद्यार्थ्यांना अपुर्णत्वच जाणवत होते. आमच्या पैकी खुप जण काहीतरी नविन आहे म्हणून आले होते. आम्ही शिकत होतो....त्या बॅच मधिल अनेकजणांनी महाविद्यालयाची परिक्षा येण्या अगोदरच क्लास बंद केला आणि वार्षिक परिक्षा आल्याने काॅलेजने पण.....त्यातील अनेकजण आज विविध क्षेत्रात नावारुपाला आले आहेत अनिरुद्ध कुलकर्णी हा संपादन, लेखन, अनुवाद व सामाजिक संघटन यात एक अग्रणी नाव बनत आहे. तर निर्भय जाधव हा स्पर्धा परीक्षा क्षेत्रात पुण्यात एक नावाजलेले नाव आहे. ज्याच्या मार्गदर्शनातून अनेक अधिकारी घडत आहेत.फक्त चटका लावणारी एकच गोष्ट...माझ्या दोन्ही सिनीयर्स पैकी प्रकाश मस्के यांनी एमपीएससी सोडली ते गावी असतात तर तोडकर यांचा संपर्क झाला नाही. एकदा सुट्टीला गेल्यावर अचानक मस्के लातूर मधे गांधी चौकात भेटले. प्रथम मी तहसीलदार असल्याने जपून पण नंतर , (मी आजही त्याच आदराने त्यांना पाहतो याची जाणीव झाल्याने ) डोळ्यात पाणी आणून त्यांनी माझं कौतुक केलं, पाठ थोपटली. आणी भावड्या तु तरी करून दाखवलंस !अभिमान वाटतो! म्हणून भरभरून बोलले. माझ्या आयुष्याला हातभार लावणारे त्यांचे हात....जर प्रशासनात असते तर.......काही स्वप्न ऊगवतात पण मुळ धरत नाहीत.. त्याला अनंत कारणे असतात पण ..असो त्यांचा आदर कायम आहे माझ्या मनात...कारण माझ्या प्रयत्नांना त्यांनी पहिल्या टप्प्यातच खुप भावनिक आधार दिला .. आणी आज माझ्या यशाचं निर्मळ मनाने कौतुक करून त्यांनी त्यांच्या विशाल ह्रदयाचा परिचय ही दिला...
याच वर्षात महाविद्यालयीन आयुष्य भरभरून जगता आले. एनएसएसचा कॅम्प तर अविस्मरणीयच! भुकंपग्रस्तांसाठी चलबुर्गा गावात गेलेला हा कॅम्प, तेथे भुकंपग्रस्तांसाठी घराच्या बांधकामासाठी पाया खोदण्याचे केलेले काम, केलेले सांस्कृतिक कार्यक्रम, उनाडपणा आणी तरीही उत्कृष्ट पथक म्हणून गौरव यातुन आपोआपच नेतृत्वगुण विकसीत होत गेला, कष्टाची सवय दृढ झाली आणी जिवाभावाचे मित्र भेटले शेळके(पिंट्या), लखादिवे,संतोष..असे खुपजण..ज्यांनी आयुष्यातील उणीवा मैत्रीने भरून टाकल्या. असेच उणीवा भरून काढणारे व सतत संपर्कात राहून प्रेरणा देणारे मित्र म्हणजे जयपाल , युसूफ, ईस्माइल, विनोद,डाॅ.संघरत्न सोनवणे( खो खो चा नामांकीत खेळाडू ते पुणे विद्यापिठाचा एक स्काॅलर विद्यार्थी व महाराष्ट्रातील वर्तमान बुध्दिवादी आगामी विचारवंत) संतोष तंत्रे (मला गाणे शिकवणारा, स्नेहसंमेलनाच्या साठी तयारी करून घेणारा संगीताचा तत्कालीन विद्यार्थी व आता संगीत महाविद्यालयाचा संचालक आणी संगीत विद्यापिठाचा सदस्य)आलोक चिंचोलकर(कोणाचेही भांडण असो आलोकने सांगितले की ते मिटणारच असा दरारा असणारा पण जेंव्हाही भेटला तेंव्हा- होतोस रे तु! अभ्यास कर म्हणून सतत आत्मविश्वास वाढवणारा महसूल खात्यातील माझा सहकारी), संजय गायकवाड (रेल्वे सेवा), महेश सुडे, प्रा. युवराज वाघमारे, सचिन आडाणे( राष्ट्रीय ख्यातीचा बास्केटबॉल खेळाडू व क्रिडा शिक्षक) असे अनंत मित्र ज्यांनी आयुष्य शिकवले व भरीव केले...तसेच मैत्रिणी ज्यांनी सामाजिक सभ्यतेचे भान ठेवत सातत्याने केलेले कौतुक...या सर्वांनी आयुष्यात अर्थ निर्माण केला. मी महाविद्यालयात एमपीएससी शिकत होतो पण वार्षिक परिक्षा आल्याने ते क्लास बंद झाले. मी काॅलेजचा अभ्यास सुरू केला.
काॅलेजचा अभ्यास सुरू केला की, आठवणारा एकमेव मित्र म्हणजे गज्या!! (गजानन सुरवसे) त्या काळातील काॅलेजचा फॅशन आयकाॅन, अत्यंत सुबक दिसणारा, हुशार पण वर्षभर स्वतःच्या धुंदित सुखी असणारा, खेळाडू (बास्केटबॉल, व्हाॅलीबाॅल) व आत्ताचा LIC -D.O., युपिएससी होता होता वाचलेला (त्यामुळे तो आजही शिव्या खातो सर्वांच्या)माझा नववी पासुनचा बालमित्र (ज्याने सदैव साथ दिली) तो अभ्यासाला यायचा. मी काढलेल्या नोट्स भांडून हक्काने वापरायचा आणी बरोब्बर स्वतःचे डोकं लावून परिक्षेत लिहायचा आणी इतरांच्या बरोबरीने मार्क्स घ्यायचा, सगळ्यांना धक्का!! वर्षभर वर्गात नियमीत नसणारा पण तरीही भरपुर मार्कस घेणारा तो अजुन भाव खाऊन जायचा. त्यातल्या त्यात मुलीमधे जास्त गाॅसिपींग असायची ती पुन्हा वाढत राहील अशी तरतुद होउन जायची. हा तो मित्र ज्याने MPSC स्वतः केली नाही . पण माझ्या MPSC च्या तयारीच्या काळात क्वालिटी इनपुट दिले व मदत केली (त्याचा संदर्भ येईलच पुढे).
या सर्व मित्रांत व विविध उपक्रमात मी राहूनही मला सतत एमपीएससीची हुरहुर असायची. मी स्वतःला खुप
ताणत होतो. कुठलीही जागा नैराशासाठी शिल्लक राहणार नाही या साठी स्वतःला गुंतवून ठेवत होतो. काही सिनियर मंडळी येता जाता मला खोचकपणे काय MPSC! काय चालले आहे म्हणून विचारायचे. मी त्यांना हसून उत्तर द्यायचो पण मनात चर्रर्र व्हायचे आणी खुणगाठ अजुन तिव्र व्हायची की, अशी टिका , खोचक शेरे आयुष्य भर नको असतील तर अभ्यास करावा लागेल. मला हरवलेले पान व्हायचे नव्हते. मला माझी गडद रेषा ओढायची होती. मला डंका पेटवायचा होता!!!!
बि ए प्रथम वर्ष हे MPSC करण्याच्या साठी कृतीशील वर्ष ठरले. या वर्षी नविन सहकारी भेटले, काॅलेज मधे क्लास होऊन तिन चार महिने नविन काही शिकायला मिळाले. मी वर्गात शिकवल्या जाणा-या अभ्यासातही MPSC चा कंटेंट पाहत असे त्यामुळे कधिकधी प्राध्यापक मंडळी अंदाज घ्यायचे. विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मी इतरही संदर्भ देवून ऊत्तर देत असल्याने मला गांभीर्याने घेतले जावू लागले. वर्गातल्या काही मुलामुलींना थोडे आश्चर्य वाटायचे, ते कौतुकाने पहायचे, कधिकधी सर ही कौतुक करायचे. पण मला कधी शेफारल्या सारखं झालं नाही.किंवा मी कधि स्वतःला विशेष समजत नव्हतो, अधुन मधुन सर लोक कंट्रोल ठेऊन असायचे. एकदा मी व संतोष काॅलेज सुटल्यानंतर एका रिकाम्या वर्गात बसलो होतो. आमची चर्चा सुरू होती. चर्चेचा विषय होता गॅट करार. आम्ही बोलत होतो. फार काही क्वालिटी डिस्कशन नव्हते ते पण गोंधळ मात्र क्वालिटीचा होता! आम्ही त्वेषाने बोलत असतानाच महाविद्यालयाचे प्राचार्य अनिरुद्ध जाधव सर राऊंडवर असल्याने ते त्या वर्गासमोर आले हे आमच्या लक्षात आले नाही. महाविद्यालयाचा नियम होता की काॅलेज संपले अथवा लेक्चर ऑफ असेल तर एकतर काॅलेज बाहेर किंवा सरळ लाएब्रेरीत बसायचे. आम्ही तर दोन्ही नियम तोडले होते. रितसर चौकशी झाली. ओळखपत्र जप्त झाले आणी खुप बोलण्याची हौस आहे तर सायंकाळी 5.00 वा. वादविवाद स्पर्धा होत असलेल्या वर्गात भेटायला बोलावले आणी ओळखपत्र घेवून जायला सांगितले. पर्याय नव्हता, सायंकाळी 4.45 वा. घाबरत घाबरत हजर राहिलो. वर्गात बसलो. फोरम फाॅर फ्री एंटरप्रायझेस तर्फे तेथे "कामात नितीमूल्यांची आवश्यकता " या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित होती.मला वाटले ऐकायला लावतील आणी नंतर समज देवून परत पाठवतील.त्या हिशोबाने मी वर्गात बसलो होतो.सर आले, स्पर्धा सुरू झाली, स्पर्धक बोलत होते, अचानक माझ्या नावाचा पुकारा झाला. मी एकदम हबकून गेलो. मी नको ही म्हणायच्या स्थितीत नव्हतो. काही ओळखीचे स्पर्धक तेथे होते. सर पण बसलेच होते. नकार देणे म्हणजे शालजोडीतील शब्दानी सत्कार झाला असता. विचार केला बोलणी खाण्यापेक्षा बोललेलेच बरे! आणी ओळखपत्र ही परत घ्यायचे होते !! मी मनाचा हिय्या करून उठलो. मी अगोदरच ऊठायला आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घेतला होता. मी उठलो, डायसवर गेलो, क्षणभर दिर्घ श्वास घेतला, आणी मी बोलायला सुरूवात केली. मी बोलत होतो सात मिनिटांचा वेळ होता मी अकरा मिनीटे बोललो. गुपचुप खाली येऊन बसलो, स्पर्धा पुर्ण होईपर्यंत बसण्या शिवाय पर्याय नव्हता. मी बसलो, माझ्यानंतर तिघेजण अजून बोलले. स्पर्धा सुरू असताना माझे सगळे लक्ष ओळखपत्रावर होते. आगाऊपणा केला असता तर सरळ घरी पत्र गेले असते. मग पालकां समोर हजेरी झाली असती. स्पर्धा संपली, निकाल जाहीर करण्याची वेळ आली. मी तो झाल्या बरोबर माझे ओळखपत्र घेवून व बोलणी खाऊन जाण्याची मानसिक तयारी करून बसलो होतो. निकाल जाहीर करायला सुरूवात झाली, अगोदर उत्तेजनार्थ बक्षिसे जाहिर झाली, तृतीय बक्षिस आणी त्यानंतर द्वितीय पारितोषिक जाहीर झाले आणी ते मिळाल्या बाबत माझे नाव!!!! मला सर्वात अगोदर माझे ओळखपत्र मिळाले, त्या सोबत प्रमाणपत्र व बक्षिसाची रक्कम व सोबत पाठीवर थाप, एक स्मितहास्य व सोबत पुन्हा वर्गात बसून गोंधळ करायचा नाही ही समज !!!! मला त्या दिवशी खुप आश्चर्याचे धक्के बसले, व एक जाणिव झाली , आपण एवढेही वाईट बोलत नाही दिलेल्या विषयावर !!!
मोठा भाऊ राहूल आता क्लासमेट होता. त्याला चित्रकलेने झपाटले होते. तो विविध प्रयोग करून त्याचे कौशल्य वाढवत होता. तर लहान भाऊ निशांत शाळेत असतानाच वादविवाद - वक्तृत्व करायला त्याने सुरूवात केली होती. गावातले काही लोक कुजबुजत रहायचे. आम्ही मात्र आमचे वेड घेवून निघालो होतो. आईवडिल आमच्यावर नितांत विश्वास ठेवून होते. तरीही अधुन मधुन ते सातत्याने जाणीव करून द्यायचे. वडिलांनी एक गोष्ट सांगितली होती ती चिरस्मरणात आहे "घडी(क्षण) गेली की पिढी बिघडते" ," तुमचे शिक्षण हिच आमची कमाई आहे" या सगळ्या गोष्टी मी लक्षात ठेऊन होतो. आणी माझी वर्षभराची ही चाललेली धडपड एकजण अत्यंत अलिप्त होवून पाहत होता. मी काय वाचतो, किती गंभीर आहे वगैरे माझ्या प्रत्येक हालचालींचा लेखाजोखा एक व्यक्ती ठेवत होता. फक्त त्याची खात्री पटली की मग तो पुढे येवून मला मदत करणार होता...आपण आपल्या धुंदीत चालत राहतो. पण काही लोक आपला मार्ग सुरळीत होण्यासाठी नकळत कारण बनतात. ते मार्ग सुकर करतात. मी स्वप्न पेरले होते,त्यांने मुळपण धरले होते. पण त्याची वाढ होण्यासाठी आवश्यक ती पार्श्वभूमी तयार होत होती. माझ्या निष्ठेपोटी अथवा कोणाच्या तरी चांगुलपणा व तळमळीपोटी मी MPSC च्या जवळ जाणार होतो
...नियती पट आखते..काही चांगले लोकही पेरून टाकते आयुष्यात...फक्त आपण आपले सत्व टिकवायला हवे. आपली आपल्या स्वप्नांवर निष्ठा हवी...पाऊलो कोएलो च्या "द अल्केमिस्ट" यातुन मिळणारा संदेश "ध्येयवेडेपणा घेवून जर आपण निष्ठेने स्वप्नपूर्ती कडे वाटचाल करत राहिलो तर सारं जग तुमच्या मदतीला धावून येते, फक्त नियती वेळोवेळी आपल्याला संकेत देत असते व आपल्याशी स्वप्नाची भाषा बोलत असते ती आपण ओळखायला हवी व चालत रहायला हवे सतत" हा एकदम खरा आहे.याची शब्दशः प्रचिती मला आहे. फक्त स्वप्न खरी असतात, अडचणी खोट्या..अडचणीमुळे उलट आपण मजबूत व दृढ व्हायला हवे. मुलं मुली जेंव्हा सांगतात की सर माझी परिस्थिती खराब आहे, घरी अडचणी आहेत तेंव्हा खरं तर ते अडचणीला शरण जात असतात हे जाणवते , खरं तर अशा अडचणी मुळेच तर आपली स्टोरी बनत असते. त्या नसतील तर आपली स्टोरी कशी बनेल. उलट अडचणी असल्यास आपण नियतीचे आभार मानले पाहिजेत कारण तिने आपल्याला लढण्याचे कारण दिले. पाय रोवून आपण थांबायला हवे आणी भिडायला हवे प्रतिकुलते सोबत.."कौन कहता है आसमां में छेद नहीं होता । जरा तबियत से पत्थर तो उछालो यारो।" मी स्वप्न पथावरील पहिला मैलाचा दगड गाडला होता...मी पाऊलवाट रेखाटायला सुरूवात केली होती..(क्रमशः)
(प्रताप )

Truly Inspiring....
ReplyDeleteThere are many who only write to inspire and motivate..
But very few who first Done It and then write...
U r one among that very Few Sir...
Thanks dear
DeleteSandesh
Pratap kupch sunder
Deleteपुढचं लवकर लिहा सर....
ReplyDelete