Sunday, May 2, 2021

जोगियाच्या मनाला....

जोगियाचे धन
जोगियाच्या हाती
मी जपल्या दिव्यात
काळजाच्या वाती

जोगिया गातो
समाधीचे गाणे
माती फुलवीते मनी
मोतियाचे दाणे

सांज भरू येते
वारा जोगियाशी बोले
झोळीत त्याच्या
सुगंधाची फुले

निघे आसुस धरती
भेटण्या चांदण्याला
मी स्पर्शु पाही
चंद्रनभिच्या गोंदणाला

दुव्यासाठी उंचावती
जोगियाचे हात
ईश ही देई
त्याला कृपाळु साथ

माझ्या मनाचा जोगिया
निघे तुझ्या दिशेला
वळणाची वाट
अंथरली कशाला?

नवगीते गातो ॠतु
जोगियाचा पावा
तुझ्या मनास फुटावा
माझ्या जोगियाचा धावा

ऋतु सांडावा ओसरी
फुले कुठे पसरू?
तुझ्या अभंगांची ओली ओवी
कशी मी विसरू

फुलपाखरांचे थवे
त्याच्या बोटावरी फेर
जोगियाच्या मनाला
परवरदिगाराचा घोर....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
1/5/2021



No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...