Sunday, May 2, 2021

दुव्याचे आशियाने.....

नभावर माझ्या 
दुव्याचे आशियाने
चांदण्याचे चमकते
आत्मे सुफियाने

हवेच्या लहरी
मुक जणू पारवे
कुणाच्या कुशिला
चंद्रस्पर्शाचे गारवे

आळवी दरवेशी
हात त्याचे वरती
डोळे आसमानाचे
त्या ओंजळीत झरती

चांदव्यात घुमे रावा
शिणले त्यांचे पंख
अवकाशी आभाळाला 
अंधारांचे डंख

रात जणू बोलते
शब्दांची फकिरी
गझलेच्या तळव्यावरील
सजती मग लकिरी

तुझ्या शब्दांचे घेत माग
मी आलो कुठल्या गावा
देव करी राउळी जणू
चिंब भक्तिचा धावा

हस! कमलदलातुन
घे धारून हा फुलवा
मी आवरून घेतो मजला
तु दिलेला भुलवा

तु नसता समीप येथे
नसतो जणू दिगंत
मी मिटवून चांदण्याना
विझवे आसमंत

चांदण्याचे आत्मे घेवून
दे आसमंता चकाकी
मी टाकिन ओवाळून 
तुजवर नयनाची लकाकी....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
2/5/2021

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...