Sunday, March 30, 2025

हे हंगामी चैत्रा....

हे हंगामी चैत्रा!
नकोस करू रे गर्व!
माझ्या सखीचं असणं
अखंड चैत्रपर्व ! !

ही चेह-याची पालवी
हा अस्तित्वाचा गंध
सखीच्या आभासात
चैतन्य मकरंद!

तु येतो तु जातो
तुजला पानगळीची भिती
हा अखंड चैत्र वाहतो
अखंड अमिट नाती

गंधभारला तु
सखी! अविट गंध
तुझ्या नवपालवीचा
घे मागून एक बंध!


("やraτa )                          
www.prataprachana.blogspot.com




 






रचनापर्व

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...