Sunday, March 30, 2025

पुर्णत्वाचे सार



एक ढगा खाली  एक वर

पक्षी दोन जग पाहतो
आणी चिंतनमग्नी साशंक
मासा किती मर्यादित राहतो

मासा करतो हळहळ
पक्षाचे विहरणे पाहून
जळाखालचे जग याचे
गेले की रे राहून!

दोघांकडेही दोन जग
एकेक दृष्टि पार
अपुर्ण असणे का खरेच
पुर्ण जगण्याचे सार?



("やraτa )                          
www.prataprachana.blogspot.com
रचनापर्व

No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...