एकांताची निरव पोकळी , मनाची सृजन घालमेल...निर्मिती आसक्त मी ...आणी हृदयात भावनांचे बहर....अभिव्यक्त होण्याच्या तळमळीचे हे पर्व.... माझ्या भावअस्तित्वाचा हा दर्पण.... एक रम्यगूढ हाक आणी वास्तव याच्या धूसर सिमारेषेवरील ही शब्दनक्षी...त्या नक्षीदार शब्दांचे हे रूप..साजिरे...गोजिरे..... लिहावे ऐसे अक्षर, जणू मनाची रेघ सांधून जावी ज्याने, काळजातली भेग.... काळीजभेग सांधणारी ही शब्दकळा...आणी काळीजकोरी ही कविता..... आणी ढवळून निघणारी आपली...प्रतिबिंबे....
Tuesday, July 14, 2026
Saturday, July 11, 2026
प्रितधारा
विज मालवून गेला
पाऊस दुर देशी
वचन शिल्लक त्याचे
विजनातील पानगळीशी
देवून चेतना रंग
धुळ पुसून गेला
रंगवून धरा पदर
कंच हिरवा ओला
हिरवी ऋतू स्वप्ने
त्याचा सजिव पेरा
वर्षावेल पून्हा फिरून
तो उमाळ्याच्या प्रितधारा..........
₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व
www.prataprachana.blogspot.com
जिवबंध
जिवबंध असा हरसाली
पाषाणाला कळतो
जिवनधारा बनून धरेचा
पाऊस ईथे भळभळतो!
₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व
www.prataprachana.blogspot.com
भिस्त
जाणते गोकूळ हृदय
जणू उद्याचे अस्त
म्हणून त्याची तेजस्वी
मोरपिसावर भिस्त
अंधार जरी का भवती
नाद रेखतील रस्ते
वृंदावनही हरखेल मग
सूर बासरी अहिस्ते!
₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व
www.prataprachana.blogspot.com
कंच पिसारे...
प्राणातले ढग सखे बघ
असे दाटके ओथंब ओले
कोण गावची हवा अनावर
मुकमुक्याने त्यासी बोले
खबर नसे की त्याला ठिय्या
वाहत जाती मुके बिचारे
स्वमग्न धरतीवरती फूलत
असता कंच पिसारे....
₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व
www.prataprachana.blogspot.com
परिसंस्था....
पृष्ठभागावर बसून
रिश्टर स्केलवर
उमटणा-या
उंचसखल रेषेवरून
जरी कळत असेल
भुकंपाच्या तिव्रतेचे
मापन......
मात्र त्यात उमटत नाही...
भुगर्भातील लाव्ह्याची
उबाळ,घूसमट,दशा,दिशा..
तूटत राहतात शैलखंड
आतल्या आत...
आणी पृष्ठावर
खंडच्या खंड तूटून
होत राहते त्यांचे
प्रस्तरभंगी निर्गमन....
मग युगा नंतर कोणी
करतो सखोल संशोधन
आणी दूरवरचे हे 'दोन' खंड
पुर्वी 'एकच' परिसंस्थेत विलिन
होते म्हणून मिळवतो
वाहवा!
लाव्हा असा निनावी
फिरत असता अंतरात
एखाद शब्द थवा
या खंडाकडून त्या खंडाकडे
करत राहतो देशांतर..
आणी शोधत राहतो...
ती भूतकाळातील...
एकच असलेली परिसंस्थेच्या खुणा !
₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व
www.prataprachana.blogspot.com
Subscribe to:
Posts (Atom)
-
पळस पेटला रानी निळ्या आभाळाला झळा वैशाखाच्या विरहात येती सावलीला कळा रंग निळ्या आभाळात ऊष्ण केशरी लकाकी पहाडाच्या माथ्याला येते ...
-
तूम कहती थी, मुझे घोसला पसंद है। बताओ वो बरगद का पेड कट रहा था,तूम कहा थी? ₱Ɽ₳₮₳₱) रचनापर्व www.prataprachana.blogspot.com
-
मै क्यों ना काफिर कहू तुम्हे? मोहब्बत मे खलल गुनाह नही? ₱Ɽ₳₮₳₱) रचनापर्व www.prataprachana.blogspot.com










