Saturday, July 11, 2026

कंच पिसारे...



प्राणातले ढग सखे बघ
असे दाटके ओथंब ओले
कोण गावची हवा अनावर
मुकमुक्याने त्यासी बोले

खबर नसे की त्याला ठिय्या
वाहत जाती मुके बिचारे
स्वमग्न धरतीवरती फूलत
असता कंच पिसारे....

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



No comments:

Post a Comment

प्रितधारा

विज मालवून गेला पाऊस दुर देशी वचन शिल्लक त्याचे विजनातील पानगळीशी देवून चेतना रंग धुळ पुसून गेला रंगवून धरा पदर कंच हिरवा ओला हिरवी ऋतू स्वप...