पृष्ठभागावर बसून
रिश्टर स्केलवर
उमटणा-या
उंचसखल रेषेवरून
जरी कळत असेल
भुकंपाच्या तिव्रतेचे
मापन......
मात्र त्यात उमटत नाही...
भुगर्भातील लाव्ह्याची
उबाळ,घूसमट,दशा,दिशा..
तूटत राहतात शैलखंड
आतल्या आत...
आणी पृष्ठावर
खंडच्या खंड तूटून
होत राहते त्यांचे
प्रस्तरभंगी निर्गमन....
मग युगा नंतर कोणी
करतो सखोल संशोधन
आणी दूरवरचे हे 'दोन' खंड
पुर्वी 'एकच' परिसंस्थेत विलिन
होते म्हणून मिळवतो
वाहवा!
लाव्हा असा निनावी
फिरत असता अंतरात
एखाद शब्द थवा
या खंडाकडून त्या खंडाकडे
करत राहतो देशांतर..
आणी शोधत राहतो...
ती भूतकाळातील...
एकच असलेली परिसंस्थेच्या खुणा !
₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व
www.prataprachana.blogspot.com

No comments:
Post a Comment