Sunday, June 28, 2026

सृजन मारवा




झाडातून उगवून यावा
घनओला शब्दगारवा
कविता सूर देते
सृजनाचा हळवा मारवा

गेल्या पडून धारा 
जणू साजन निघून गेला
निनाद ठेवून अंतरी
अलगद गर्त ओला

मी थेंबे थेंबे सांधतो
सैलावणारी उत्सूक माती
शब्दाआडून जन्मांतराचे
महाकाव्ये निनादती....


₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com






No comments:

Post a Comment

सृजन मारवा

झाडातून उगवून यावा घनओला शब्दगारवा कविता सूर देते सृजनाचा हळवा मारवा गेल्या पडून धारा  जणू साजन निघून गेला निनाद ठेवून अंतरी अलगद गर्त ओला म...