ढग आले सखे
कृष्णरंगी भवताली
धरित्रीला पांघराया
राधारंगी शाली
सूर निनाद बासरी
इंद्रधनूची हाक
सृष्टीस गोंजारते
वृंदावनी आर्त हाक
₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व
www.prataprachana.blogspot.com
एकांताची निरव पोकळी , मनाची सृजन घालमेल...निर्मिती आसक्त मी ...आणी हृदयात भावनांचे बहर....अभिव्यक्त होण्याच्या तळमळीचे हे पर्व.... माझ्या भावअस्तित्वाचा हा दर्पण.... एक रम्यगूढ हाक आणी वास्तव याच्या धूसर सिमारेषेवरील ही शब्दनक्षी...त्या नक्षीदार शब्दांचे हे रूप..साजिरे...गोजिरे..... लिहावे ऐसे अक्षर, जणू मनाची रेघ सांधून जावी ज्याने, काळजातली भेग.... काळीजभेग सांधणारी ही शब्दकळा...आणी काळीजकोरी ही कविता..... आणी ढवळून निघणारी आपली...प्रतिबिंबे....
झाडातून उगवून यावा घनओला शब्दगारवा कविता सूर देते सृजनाचा हळवा मारवा गेल्या पडून धारा जणू साजन निघून गेला निनाद ठेवून अंतरी अलगद गर्त ओला म...
No comments:
Post a Comment