झाडातून उगवून यावा
घनओला शब्दगारवा
कविता सूर देते
सृजनाचा हळवा मारवा
गेल्या पडून धारा
जणू साजन निघून गेला
निनाद ठेवून अंतरी
अलगद गर्त ओला
मी थेंबे थेंबे सांधतो
सैलावणारी उत्सूक माती
शब्दाआडून जन्मांतराचे
महाकाव्ये निनादती....
₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व
www.prataprachana.blogspot.com





