Sunday, April 26, 2026

गाठतो गोकुळ




भक्त देई हाक
दचके पांडूरंग
तो टाळतो हारीने 
जाचके अभंग

मौन धारतो असे
जसा डोंगर निश्चल
आणी राखतो प्रयत्ने
ढासळते आत्मबल

रोजची साधना
त्याला करते व्याकूळ
विसरण्या हाक देव
गाठतो गोकुळ

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com





लोपणा-या लोककथा



शुष्क पाकळ्यांचे
पाहून अबोली रंग 
जुन्या फडताळाचे
उसवते अंतरंग

त्या शब्दांचे मंद
कवितेत मूरणे
आणी कवितेने मुक
फडताळात झुरणे

कोण जाणेल का कधी
त्या शब्दांच्या व्यथा?
बनन्या आधी त्या
लोपणा-या लोककथा


₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com





गोपूरम्



मूख्य मंदिर दूर
गोपूरम दावी वाट
ओलांडे सखी नित्य
हाती आरतीचे ताट

नूसतीच खूण ते
मंदिरासाठी उंच खडे 
कुणाच्या मांगल्यासाठी 
जणू कोण वाजवे चौघडे

गाव निजते सुखाने
दूर जागते जशी वेस
कधी नसते अक्षर
ती शब्दावरली रेष 

पिंडीकडे जाता जाता
जशी दिसे दीपमाळ 
गाव गाठण्या ओढीने
ओलांडावा जणू माळ 


कोणी थबकावे असे
नसेल जरी काही
रूढ दाटक्या मनाला तशी
देता येत नाही द्वाही!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com










Saturday, April 18, 2026

कालवत नाही?



नजरेचा रिता आस
दृष्टीत निर्वात विश्व
चांद आला हरिणरथाने
सुर्य घेवून गेला अश्व

एक एक चांदणी 
हळूहळूने उगवे
गर्द तमात उमलते
मग स्वप्न एक भगवे

रात उभ्याने चेतते
दिवा मालवत नाही
चांदण्याच्या अंतरी खरेच
काही कालवत नाही?

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



मूक खूलासा



शब्दांचे जूलूम नको ते
आणी नको दिलासा
अनिच्छुक नकार अंधूक
साक्षी मूक खुलासा!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



नश्वर भास



माझ्या किती कविता
अशाच काठावरती
गीत आत्मधूनीचे तूझ्या 
कायम ओठावरती

हरवतात का झाडे?
घनदाट जंगल असता
की सापडत नसतो नक्की
स्वतःलाच रस्ता?

नयनतळाला कोरड
ना नसते कुठली आस 
का जोजवत असतो मी
नसलेले नश्वर भास?

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



सहस्त्र



भासाचा जरतारी तंतू
बनत नसतो वस्त्र
वास्तवाचे धागे हवेत
त्याला सहस्त्र सहस्त्र!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com


धिराचा हात



तू चालत निघ ना थोडे
पुढे नदीच्या काठी
होतील दोन तिरांच्या
अवचित उरभेटी

करतील हितगुज थोडे
युगाची होईल बात
पहा जमेल तर देण्या
स्वतःस धिराचा हात!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com




मोकलेल धाय



बोलू किती खरे
पडतात चरे
काळजाला!

म्हणू असे काय
मोकलेल धाय
तूला!

कठोर तरी किती
पाषाणाला भिती
तूझी!

दे ना एक हाक
वचनाला राख
निकराने!


₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



मैं हूं?



ए मेरे रहेबर कितनी सहेजता से करवाते हो तूम 
हां मै हूं...से मै हूं? तक का सफर...



₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



मिसाल



सूनो ना । वाकई तूम बेमिसाल हो।
क्या मेरे पास कोई मिसाल देने के लिए है भी.....?


₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



कयामत तक



चन्द लम्हे अता करते
सहेजता मै कयामत तक।


₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com

खलल




मै क्यों ना काफिर कहू तुम्हे?
मोहब्बत मे खलल गुनाह नही?

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com

मुमकिन



चलो ठिक है मेरा इलाज नामुमकिन है।
तुम भी तो कूछ  मुमकिन करते ।

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com

सिमटकर



शादी मे गाती है कूछ औरते बिदाई का गीत 
और लाती है धून अपने अंदर सिमटकर अपने घर।

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com

तन्हा



मेरे अंदर की तेरी भिड ने
तन्हा कर दिया है मूझे।

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com

रेष पुसली...



अमावस्येच्या गर्दतमाचे 
मी दुर्मीळ प्रतिबिंब 
मी तुझ्या भूतलावरचे
एक सूक्ष्म पूसट टिंब 

कसली वाढ ना वृद्धी
ना होते घट कसली 
मी रेष पाटीवरची
हवी तेंव्हा पूसली.....

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com


घनघोर उदासी



व्यापून एक उदासी मी 
घनघोर कोसळत असतो
उंचीला नभाच्या तरीही
मातीत मिसळत असतो

धरतीत नसतो थारा
ठेचाळत सागरा मिळतो 
पुन्हा कोसळढग होण्या
मी सुर्याखाली जळतो

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com


नको मला भरारी



मी ठिक-या ठिक-या येथे ,घाव असा करारी
घे कापून पंख माझे, नको मला भरारी!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



शिल्लक



चल! दे परत मला ते ,जे तूला वाहिले होते
हृदयही माझे नाही, जे जपून ठेवले होते

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



ग्वाही!



मी जाऊ कुठे मुक्याने, शिल्लक नसण्या काही
अंतिम दिनास मात्र ,प्रेमाने द्यावी ग्वाही! 

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



नित्य खात्मा



असेल कोणी आत, शाकारत माझा आत्मा
आणी खंजीर ओळखीचा,करतो नित्य खात्मा

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com


स्पंदत नाही



हृदय स्पंदत नाही आता, हादरे बसत असता
कोण असे का देते, आपल्याच कोणा खस्ता?



₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com


कुंद




सांज आली भरतीला
सखे रितेपण दाटे
अनोळख्या पायवाटी
अगणित काटे 

चांद झूरणीचा चढ
चढतो धिमा मंद 
चैत अशी नितळ 
तरी हवा का कुंद?

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com


तळ..



तळ गाठेन म्हणूनी सखे
मी देतो तूला हाक
नकोस वाहुन देवू 
प्रवाहात आणभाक

भरोसा काय नदीचा 
ती वाहत अखंड चाले
काठावर तिच्या सवे मी 
सोसत अनंत भाले....

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com


Monday, April 13, 2026

जिवनदायी



किती जीवनदायी 
ही अक्षराची वळणे 
आजचा प्रकाश पाया 
निकराने तुझे जळणे!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com




मानवतेचे गाणे



आभाळ पेलण्याला 
आम्हा दिलेस बाहू
दिल्या तूझ्या दिठीने
तेजोप्रकाश पाहू!

 गर्भात तू युगाच्या
पेरली पिंपळपाने
सारून भेद आले 
मानवतेचे गाणे !

मानवमूक्तिच्या प्रणेत्यास सहृदय वंदन!
भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना नमन!


₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com




Sunday, April 12, 2026

चांदगूणाचे....



अरण्यातले झाड सखे गं!
उभे कसे बघ पित फुलांचे
माहेरवाशिण स्वप्न राखते
ज्या फांदीच्या पर्णझूलांचे

झिलमिल झिलमिल वारा गातो
गीत कुणाचे, शब्द कुणाचे
भाव सखे की तूझ्या आभाळा
लगडून जावो चांदगूणाचे........

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व
www.prataprachana.blogspot.com

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...