Sunday, March 30, 2025

मागत नाही....

रचनापर्व


अज्ञात हवेहवेसे
तुझ्या अंतरी काही
ओंजळीतले आचमन
होते दिर्घ प्रवाही

बनतो त्याचा सागर
तु शिंपल्यात त्याला जपते
या काळजातले मोतीबन
त्या काळजात लपते

या लपाछपीचा
हिशोब लागत नाही
या वाहिल्या अर्ध्याचे
मी पण मागत नाही......

("やraτa )                          
www.prataprachana.blogspot.com

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...