Sunday, March 30, 2025

विराण भूल


पंख फुटले,गाव सुटले
बेवारस झाली घरे
बसक्या कळकट दाराआड
घर मुक थरथरे

कथा गेल्या,पार गेले
झाड चौकात एकले
काळ सरला ना मुसाफिर
कोणी येथे टेकले

दूरवरचा तांडा गजबज
हल्ली फिरकत नाही
काफिल्यांच्या पायरवाने
माती थिरकत नाही

जर असती माती खूली
तर आली असती वाहून
सिमेंट थिजून दगड
शहरात जाते राहून

ते जगणे एकजीव होते
माणसे उडत नव्हती
ही असली विराण भूल
गावावर पडत नव्हती!


("やraτa )                          
www.prataprachana.blogspot.com

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...