Sunday, March 30, 2025

वळीव हळवी ओल


 

अनाहूत एक ढग
धो धो कोसळतो
धरित्री पसरे बाहू
तित तो मिसळतो

दुरावा अनंताचा
आकाश  मिटवून घेते
वळीव प्रित त्याची
धरती साठवून घेते

तो अंतरी पेरे
हाक हळवी खोल
भर उन्हाळा पाही
प्रितीची त्यांच्या ओल.....


("やraτa )                          
www.prataprachana.blogspot.com

 


No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...