Friday, May 1, 2026

महाभिनिष्क्रमण


तथागता !

तू भेटलास जेंव्हा
राहूल आणी यशोधरेस
पून्हा बुध्द बनून संयत
तेंव्हा कचरले असेल का तूझे मन?
ते तूझे त्यांना निद्रिस्त
असताना सोडून निघणे
तरळले असेल का तूझ्या
सम्यक नजरेत?

म्हणूनच का तू निग्रहाने
कितीतरी मोह मायेवर
विजय मिळवून
प्राप्त केलेलं बुध्दत्व
दीक्षा रूपाने दिलेस
त्यांना पदरात?

आणी त्याचक्षणी तू
साधलंस तुझ्या
महाभिनिष्क्रमणास
यशोधरेच्या
नजरेतील प्रतीक्षारत
मुकअनूमोदन

आणी तेंव्हाच  तूझे
ते "महाभिनिष्क्रमण"
ख-या अर्थानं
बुध्द झालं!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व
www.prataprachana.blogspot.com

बुध्द पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
१ मे२०२६




No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...