Friday, May 1, 2026

अत्त दिप भव!



शाक्यमूनी तथागता!
वैशाख पोर्णिमेस
तू पद्मफूलावर पाय देत
अवतरलास !

मात्र !
बूध्दत्व साधण्यासाठी
तू धुंडाळलेस कितीतरी
काटेरी मार्ग!

निकराने निग्रहाने
वैशाखाच्या चंद्राखालीच
तू मिळवलेस शाश्वत
बुध्दत्व!

आणी त्याची तेजोमय शितलता
दिलीस जगावर उधळून !

तू सांगीतलेस आम्हाला तरीही
स्वंयप्रकाशी व्हा!
अंतरातल्या तमास हटवा 
अत्त दिप भवो!  

तू लखलखत राहिलास
त्याहून दीप्तिमान!
आणी त्याच चंद्रास 
साक्षी ठेवून केलेस तू
महापरिनिर्वाण!

बहूधा
आम्हाला कायम जाणीव देण्यासाठी
तूझ्या प्रत्यक घटनेस तू ठेवलास
हा वैशाख पोर्णीमेचा चंद्र साक्षीस!

मग आम्हीही त्याला साक्षी ठेवून
गिरवतो तूझा परिपाठ नित्य!!

लखाखता चंद्र कितीही तेजस्वी तरी
परप्रकाशी!
स्वंयप्रकाशाचे तेज त्याहून मोठे! 
अत्त दिप भवो!
अत्त दिप भवो!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com

बुध्द पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
१ मे२०२६








No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...