Monday, March 31, 2025

इमान



डाकिया कसूरवार नही
उसे  तो इनाम देना चाहिए।
और घर ,पता ,शहर,दिल
बदलने वाले को इमान देना चाहिए।



("やaraτa ₱)                          
www.prataprachana.blogspot.com

थाप


हाक जणू की थाप
उडती काळीज पाखरे
विसावण्या त्यांना घडीभर
झाडोरा तु राख रे!





("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com


 

भिरक

कागद विरून गेले
कविता फिरकत नाही
शब्द बनावर माझ्या
चैत्र भिरकत नाही

राखून आहे फांद्या
भरतील चैतन्य सोहळे
येतील रंगीत फुले
आणी पर्ण कोवळे....




("やaraτa ₱)                          
www.prataprachana.blogspot.com










सुखी बैरागी




शांतवलेला पक्षी
चंद्र चेतलेला
एकांत घनभारी
दोहोवर बेतलेला

दोहोच्या डोळ्यातली
निज टक्क जागी
निवांत दूर निजलेला
एक सुखी बैरागी!!



("やaraτa ₱)                          
www.prataprachana.blogspot.com

पाऊस भोई



नुसत्या गडगडाटाने
माती न शांत होई
काळीज देतो ढग
वाहतो पाऊस भोई!


("やaraτa ₱)                          
www.prataprachana.blogspot.com



कवचकुंडले

कवितेने दिली हाक 
मी शब्द मनोभावे मांडले
जसा कर्ण हसत करतो
दान कवचकुंडले!




("やraτa )                          
www.prataprachana.blogspot.com



Sunday, March 30, 2025

विराण भूल


पंख फुटले,गाव सुटले
बेवारस झाली घरे
बसक्या कळकट दाराआड
घर मुक थरथरे

कथा गेल्या,पार गेले
झाड चौकात एकले
काळ सरला ना मुसाफिर
कोणी येथे टेकले

दूरवरचा तांडा गजबज
हल्ली फिरकत नाही
काफिल्यांच्या पायरवाने
माती थिरकत नाही

जर असती माती खूली
तर आली असती वाहून
सिमेंट थिजून दगड
शहरात जाते राहून

ते जगणे एकजीव होते
माणसे उडत नव्हती
ही असली विराण भूल
गावावर पडत नव्हती!


("やraτa )                          
www.prataprachana.blogspot.com

वळीव हळवी ओल


 

अनाहूत एक ढग
धो धो कोसळतो
धरित्री पसरे बाहू
तित तो मिसळतो

दुरावा अनंताचा
आकाश  मिटवून घेते
वळीव प्रित त्याची
धरती साठवून घेते

तो अंतरी पेरे
हाक हळवी खोल
भर उन्हाळा पाही
प्रितीची त्यांच्या ओल.....


("やraτa )                          
www.prataprachana.blogspot.com

 


पुर्णत्वाचे सार



एक ढगा खाली  एक वर

पक्षी दोन जग पाहतो
आणी चिंतनमग्नी साशंक
मासा किती मर्यादित राहतो

मासा करतो हळहळ
पक्षाचे विहरणे पाहून
जळाखालचे जग याचे
गेले की रे राहून!

दोघांकडेही दोन जग
एकेक दृष्टि पार
अपुर्ण असणे का खरेच
पुर्ण जगण्याचे सार?



("やraτa )                          
www.prataprachana.blogspot.com
रचनापर्व

हे हंगामी चैत्रा....

हे हंगामी चैत्रा!
नकोस करू रे गर्व!
माझ्या सखीचं असणं
अखंड चैत्रपर्व ! !

ही चेह-याची पालवी
हा अस्तित्वाचा गंध
सखीच्या आभासात
चैतन्य मकरंद!

तु येतो तु जातो
तुजला पानगळीची भिती
हा अखंड चैत्र वाहतो
अखंड अमिट नाती

गंधभारला तु
सखी! अविट गंध
तुझ्या नवपालवीचा
घे मागून एक बंध!


("やraτa )                          
www.prataprachana.blogspot.com




 






रचनापर्व

मागत नाही....

रचनापर्व


अज्ञात हवेहवेसे
तुझ्या अंतरी काही
ओंजळीतले आचमन
होते दिर्घ प्रवाही

बनतो त्याचा सागर
तु शिंपल्यात त्याला जपते
या काळजातले मोतीबन
त्या काळजात लपते

या लपाछपीचा
हिशोब लागत नाही
या वाहिल्या अर्ध्याचे
मी पण मागत नाही......

("やraτa )                          
www.prataprachana.blogspot.com

बहावा


रचनापर्व

चिंब प्रतिबिंब


रचनापर्व

अर्ध्य हिशोब


रचनापर्व

गेल्या पक्षांची गीते


रचनापर्व

एकटपण


रचनापर्व

खंजर


रचनापर्व

लगाम


रचनापर्व

भाग्यरेखा


रिती घरे


रचनापर्व

कविताबन...


रचनापर्व

दफन


रचनापर्व

निर्माल्य फुल


रचनापर्व

उतराई


रचनापर्व

नवनक्षी चंग


रचनापर्व

चैत्र नांदी


रचनापर्व

चुकले


रचनापर्व

सांधत धागे


रचनापर्व

काट्याचे अहेव लेणे


रचनापर्व

पालवी


रचनापर्व

चिमूटभर माती


राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...