"अमृतलिपी-मराठी"
"भाषा ही आमच्या पिढीजात जिवनाचा साररूपी अखंड प्रवाह असते" ती निव्वळ ध्वनी व वर्णाची गुंफण नसून ती अनेकाभिव्यक्त साधनापैकी सर्वोत्तम सर्वमान्य साधन आहे. जगातील कुठलीही भाषा टिकणे हे त्या -त्या काळातील समाजासाठी वरदान असते. कारण भाषा एका दिवसात तयार होत नाही ती पिढ्यानपिढ्याचे शहाणपण, सुज्ञपण,व्यवहार, भावभावना याचा एक जिवंत प्रवाह असतो..आपल्या पुर्वजाचे व वर्तमान ज्ञान आपणास मिळण्यासाठी भाषा हे एकमेव माध्यम असते...मराठी ही अशीच एक अमृतवाहिनी भाषा.....
प्राकृताच्या मुळारंभापासून,म्हाईमभट,स्वामी चक्रधर,शिवकालीन बखरी,आज्ञापत्र, संत-पंत-तंत ते प्रमाणभाषा,बोलीभाषा ते आजची बहूभाषेचा प्रभाव झालेली व समाजमाध्यमावर वापरली जाणारी मिश्रित भाषा हा तीचा प्रवास... कविता, ललित,कादंबरी, लावणी,अखंड,अभंग,निबंध,कवने,लावणी ते लोकसाहित्यातील भुपाळी,भुलाबाई,दशावतार असे नानाविध तीची रूपे...पशू असलेल्या माणसाला समकालीन जगाशी जोडण्याचे मुलगामी साधन म्हणजे भाषाच असते..ती व्यवहारात व चिंतनात आपणास जगवणारी व तगवणारी आई असते...ती असते म्हणून आपणही तगतो...तीच्या शिवाय जगणे नाही...ती कुठल्याना कुठल्या स्वरूपात आपल्याला तगवतेच उदाहरणार्थ दृष्टीविहीनास कळणारी स्पर्श व श्रवणाची भाषा,मुकबधिरास समजणारी संकेताची भाषा...भाषा..जिवनरेषा....
त्यात अमृतलेणी असणारी आपली समृद्ध मराठी भाषा...ती कधी ज्ञानीयाचे पसायदान तर कधी तुकोबाचा अभंग बनते,ती कधी ज्योतीबाचे अखंड तर कधी साऊची बावनकशी सुबोध रत्नाकर असते,ती कधी बालकवींची हिरवे हिरवे गार गालीचे तर कधी दलितांच्या विद्रोह व वेदनेची भाषा असते..ती कधी बालसुलभ तर ती कधी आईने माहेरच्या आठवणीत गाईलेली जात्यावरची ओवी असते....ती सुर्वेंची कामगार वाणी तर कधी फकिराचा विद्रोह आणनारी परिवर्तनरेषा असते...ती आंबेडकरांचा वैगुण्याविरूध्दचा लढा तर कधी साने गुरूजींची कोमल हळवी भावकथा होते...ही भाषा समृद्धीचा झरा आहे तो जिवंत ठेवणे आपल्या सर्वांची जबाबदारी ठरते ...कारण एक भाषा संपणे म्हणजे अनंत पिढ्याच्या संचित शहाणपणाशी आपली ताटातुट ठरलेलीच.....!! तीच्या वैविध्याचा सर्वांगीन आढावा हा एवढया संक्षिप्तस्वरूपात अशक्यच.....!
कुसुमाग्रजांच्या पृथ्वीचे प्रेम ते ग्रेसांच्या नादमयी सांध्यपर्वातील वैष्णवी ते अलीकडील समाजमाध्यमावर तीचे नवसंकल्पनीय रूप असणारा प्रवास....ती तगली पाहीजे...ही पिढीजात संचिताची ठेव जगली पाहिजे....ही आमची राजभाषा,मातृभाषा, भावभाषा,ज्ञानभाषा, व्यवहारभाषा,बोलीभाषा,प्रमाणभाषा,अभिव्यक्तीभाषा,संवादभाषा म्हणून उत्तरोत्तर वृद्धींगत झाली पाहिजे....
मराठी संवर्धनाच्या संकल्पनेसह मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
▪ (प्रताप)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
(२७ फेब्रुवारी २०२२)
No comments:
Post a Comment