चांद भिजला भिजला
पुनवेची उलाघाल
ढग गोंजारतो सखे
मंद चांदण्याचे भाल
जिव झुरला झुरला
चांद झरता आभाळी
रात एकांत घडीची
स्वप्न नव्हाळी नव्हाळी
येते कशी हाक
दुर रानातून खोल
कशाला लावते
गंध चाफ्याला तु बोल
फुल गळले गळले
फांदी करते का शोक?
बघ सरत्या ढगांचा
तुझ्या दिशेलाच रोख
कशी येते झोप
बघ चढत्या रातीला
मी सांगू काय दुःख
जळत्या वातीला
दे ना तुझा हात
या श्रमल्या हाताला
मी वाहीन गं शब्द
तुझ्या भिजल्या गीताला
"やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
१.८.२०२३

No comments:
Post a Comment