झाड करते नित्य
एकच एक धावा
कायेस त्याच्या नित्य
तुझा बहर यावा
झाड गाते गाणे
चिरे कातळ भारते
एक नव्हाळी कोणी
तेथे ही संभारते
बहराचे कौल मुके
या दिर्घ पाऊस प्रहरी
राऊळी जणू उभा
मुक हसमुख श्रिहरी
कशास येती पोरी
झाडास घेण्या झोके?
आणीक भुलई गीतांनी
विस्कळती हृदयाची ठोके
किती साचले हिरवे
सृष्टीच्या ठायीठायी
ये ना तु ही अवतरुन
दे झाडास हिरवाई........
("やraτa প")
www.prataprachana.blogspot.com
२३ .८.२०२३
No comments:
Post a Comment