चांद थकला निजला
एक ओवी फिरे रानी
कुण्या श्वासाची धून
भास आभास या कानी
रात चाहुलते मंद
भास मोरपीसी जणु
देह गाठतो तळाचे
भारावले अणुरेणू
हाक अंतरीची निघे
रानावनात फिरते
एक न पडीचे स्वप्न
तुझ्या दाराशी झुरते
दे ना! तुझा चाफा
गंध उसासे भरतो
हा ढग एक मुका
मुकमुक्याने झरतो
बदलते का कुस
रात अंधारा भेटण्या
मी देऊ एक तारा?
तुझ्या नभाला तुटण्या
माग एक इच्छा
होऊ दे साकार
या रातीला येवू दे
तुझ्या छवीचा आकार....
("やraτa প")
www.prataprachana.blogspot.com
२२ .८.२०२३
No comments:
Post a Comment