माझे भरले आभाळ
कोण पाऊस धुमसे
एक भलामोठा ढग
मुकमुक्याने हमसे
तो सोडत उसासे
चाले दिशाहीन
त्याच्या निरव काळीजी
झरण्याची ओली धून
वारा देई साथ
तो मुलुख गाठतो
तुझ्या गावावर सखे!
तो थेंबथेंबाने तुटतो....
होते घालमेल
ढग मुक्याने झरतो
असा पावसाळा
ओल्या मनाने सरतो....
"やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
१४ .८.२०२३
No comments:
Post a Comment