शोधतो पार्थवी कोणी
आक्रोशे वनवासी जंगल
पारंबीची वृक्ष मुके
कळे न काही मंगल
देईल खुण सखीची
होऊन जटायू कोणी?
विरुन जाईल अलगद
मारिच भुलवी वाणी?
स्वर आकांती भरतो
जंगलास टोचे जाचणी
सखीच्या पाऊल वाटे
सन्याशी अंथरे पापणी
ही वेल कोणती शहारे
आकांत तिला का कळला?
परदेशी गमनाचा थवाही
कळवळून माघारा वळला
सांगेल कुणी का कोठे
का झाले सारे मुके?
होऊ दे अवनी दर्शन
सरुनी मृगजळी धुके.......
("やraτa প")
www.prataprachana.blogspot.com
२५.८.२०२३
No comments:
Post a Comment