Tuesday, August 8, 2023

बाण जराचा


मी अलवार सावरे सारे
तरीही सुटून जाते
बहराच्या फांदीवरुनी
साळुंकी उठुन जाते

हाक पाठलाग करते
आभाळ भरुन येते
सर अनामिक सयेची
मातीत झरुन जाते

प्रतिक्षा मुळ धरते
चिरकाल वन होते
एकट व्याकुळ बावरे
जंगल बन होते

गोसावी निळा मग कोणी
झाडाखाली निजतो
बाण जराचा जहरी
तळपायी मुक थिजतो....
"やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
९ .८.२०२३

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...