Thursday, August 3, 2023

कळवळ्याचा लेप....


आला घरट्याला थवा
माघारा निघेना
रानशिवारी हिरवाई 
तो कशाने बघेना

झाले काय दुःख
होईना जाणीव 
पावसाला कशी
भासे ओली उणीव 

पुकारतो नभ
पंख फडाडीचे गाणे
दुःख सोसते घरटे
मुक निःशब्द धीराने

द्यावे त्याला काय
तो घेईल का झेप?
त्याच्या वेदनेला माझ्या
कळवळ्याचा लेप.... 


"やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
४.८.२०२३










No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...