Thursday, August 31, 2023

झाड होणे.....


मी एक झाड सुन्न 
उदास उभे एकले
नव्या दिशेसाठी ज्यास
थव्याने मागे टाकले...

झोंबण्यासाठी हवेला
रोवून घेतले सारे
येईल बनूनी हवा
जेंव्हा घोंगावणारे वारे

कोण थकूनी झोपला
कु-हाड त्याच्या उशिला
झाड कधी का जाते
हवेच्या कुशिला?

तोडेल कोणी फांद्या
ओरबडेलही पाने
हवेस काय माहित 
कसे असते झाड होणे.....!

                        ("やraτa প")                           
www.prataprachana.blogspot.com
३१.८.२०२३ 





   









No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...