Wednesday, August 23, 2023

हुंदकाळल्या......


झाड उभे गं बाई!
फांदीला त्याच्या झोक
किर्र उन्हाच्या वेळी
बसती तेथे लोक

परदेशी कोण पक्षी
फांदीला सांगावा धाडे?
हरखून बहर नेसती
रस्त्या काठची झाडे

कोण मुसाफिर एकला
वाजवतो एकतारी
लकेर हवेस देतो
एक आर्त तगमगणारी

त्या आर्त हाकेचे ओले
होते पाऊस गाणे
फांदीस तुझ्या फुटती
कवितेची माझ्या पाने

झाडाला बहर येता
येती आठव पक्षी
शिळ तयांची घुमते
या हुंदकाळल्या वक्षी


                       ("やraτa প")                           
www.prataprachana.blogspot.com
२२ .८.२०२३ 

 




 



   

 

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...