खुणवे शरद चांदणे
लागे थंडीची चाहूल
माझ्या कवितेच्या वाटे
सखे तुझे रुतले पाऊल
चंद्र दुधात सांडतो
तुझ्या तनाची आभा
मी टांगतो आस तुझ्या
उत्सावल्या नभा
छबी तुझ्या मिरेची
कृष्णछायेची सावली
वाहे माझा धावा
वृंदावनाच्या पावली
या राती असा कसा
विखरे चांदण्याचा तिर ?
माझ्या नदीचाही अनावर
सुटे वळणाचा धिर
सारे दुधाळले भवताल
त्याला शामरंगी कांती
घे शब्दाची विराणी
दे हृदयास या शांती
वाहतो आहे मी निरंतर
कितीक युगे सरती
तुझा आभास गडदतो
आणी उंच चंद्रा वरती
("やraτa প")
www.prataprachana.blogspot.com
२८. १०.२०२३