कोंब फुटले झाडाला
आली त्याला हाक
त्याचा अंतराला येते
कोण्या आपुल्याची झाक
झाडा येती वेणा
जणू गौतम चालला
त्याच्या काळजाशी
जणू बुध्द बोलला
कसले हे रंग
त्याच्या रूधिरा रंगती
त्याच्या कोमलाला लाभे
आत्मगंधाची संगती
खुलते वाटिका
हसे रान सारे
मधूमक्षिकेच्या साठी
राखलेले मधू चारे
कोण्या आम्रपालीचे
रुप त्यास छान येई
तुझ्या चक्षूने का फुल
सन्यासी भगवे होई
मी लावलेले ध्यान
जणू समाधी गाठते
अंतराच्या आत खोल
झाड रुजले वाटते.....
("やraτa প")
www.prataprachana.blogspot.com
२४. १०.२०२३

No comments:
Post a Comment