Saturday, October 21, 2023

अज्ञाताच्या वाटे


गीत अनावर साचे
हृदयाच्या खोलदरी
लाट तयाची अवरुध्द
येई नयन तिरी

या भिजक्या पाऊलवाटा
चांद नदीत बुडतो  
निश्चल पाषाणाचा
शिलालेख बघ घडतो

लिपीस वळणे देते
तुझ्या नदीचे पाणी
मी निर्मित जातो अक्षय
ओली हिरवी गाणी

ताटवा आभासी खुलतो
तव गंध तयाला भेटे
हा गंध आभासी नेतो
अज्ञाताच्या वाटे.....
                   ("やraτa প")                           
www.prataprachana.blogspot.com
                 २१. १०.२०२३ 



 




No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...