अंधार असा का जळतो
धुप जणू दरवळते
अदृश्य हाक कुणाची
का मनी कळवळते?
करुणेचा जोग मनाला
झाडात उदासी फिरे
लुकलुकणारे दिवे सांगती
दूर निजली घरे
त्या उंच शिखरावरती
वावरे एकला जोगी
निरव तमाच्या साक्षिने
निद्रा आपली त्यागी
चंद्र ढगाशी निजतो
निद्रेत चांदणी हसते
धुक्यात विरले जंगल
अंधार कुशिला बसते
दुर पिराच्या पायरी
फकीर दुवा पढतो
त्या लयीवर स्पंद
अंतरात धडधडतो
असे स्तब्ध सारे
आस एकली जागी
फकीर पढतो दुवा
ध्यान लावतो जोगी....
("やraτa প")
www.prataprachana.blogspot.com
२६. १०.२०२३
No comments:
Post a Comment