स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस
भाग 22: मुलाखत......(2)
मुलाखत कक्ष डाव्या हाताला होता. बाहेर एक खुर्ची होती, दारावर एक शिपाई होते.आत मधे एका मुलाची मुलाखत सुरू होती. पोर्च मधे सन्नाटा होता. खाली किमान इतर उमेदवार तरी होते.समूहात असलेली मानसिक सुरक्षितता तरी होती तिथे...पण ..इथे मात्र निखळ एकटेपणा,तुटलेपणा...ही फार नाजूक अवस्था होती सर्व तयारीच्या काळातील...जर इथे भिती हावी झालीतर आजपर्यंत केलेल्या अभ्यासाचा काहीच फायदा होत नाही.राजेंद्र ढाकणे(शालेय पोषण आहार अधिक्षक) हा या बाबत जाण असलेला मित्र! सुदैवाने त्याने मुलाखतीच्या काळात स्थिर कसे रहायचे या बाबत चर्चा केली होती..मी ते आठवू लागलो...सर्व मित्रांनी दिलेले सल्ले डोक्यात आणू लागलो..तसे पाहिले तर भिती वाटत नव्हती पण दडपण होते...सहज दुरवर पाहीले ...दिनेश झांपले,विजय कबाडे थांबले होते..पाहत होते..शांत राहण्याचे व 'तोड डालो' वाले इशारे सुरू होते. मी काही क्षण डोळे बंद केले..मागील दोन वर्षाची साधना, मेहनत डोळ्यासमोर आली..आतील स्पर्धक फुरफुरू लागला..अचानक खुमखुमी दाटून आली..मी येणारे दडपण झटकले..आणी त्या दबावाच्या अवस्था जाऊन उत्सुकता निर्माण झाली....आणी आतला मुलगा कधी बाहेर येतो आणि माझा इंटरव्ह्यु कधि सुरू होतो..वाटायला लागले...मी दबावावर मात करून स्थिर झालो होतो...स्पर्धक संचारला होता आतला....आता फक्त टक्कर!! ...दुसरीच दुनिया होती ती...कदाचित माझे शब्द तेवढे समर्थ नाहीत ते मांडायला....अचानक दरवाजा उघडला ..आतला मुलगा बाहेर आला..मी त्याच्याकडे पाहून इशारा केला "कसं काय?" त्याने इशा-यानेच सांगीतले इतके काही ठिक नाही..लक्षात आले आपल्याला टफ अवस्थेला तोंड द्यावे लागू शकते..मी सज्ज झालो...मला आत येण्यासाठी निरोप मिळाला...मी लक्ष विचलित होवू नये म्हणून कुठेही न पाहता कक्षाकडे निघालो.
"मे आय कम इन सर?" "या, बसा!" "धन्यवाद सर" गुड माॅर्निंग सर, गुड माॅर्निंग मॅडम" आपोआप घडले..डोळ्यासमोर कोणीच दिसत नव्हते.मी खुर्चीत बसलेलो होतो,हातातली फाईल सन्माननीय पॅनेल सदस्यांकडे तोंड करून टेबल वर ठेवली गेली...मी परत स्थिरतेकडे धावू लागलो...MPSC चे अध्यक्षांचेच पॅनेल,करकेट्टा मॅडम(IAS),बनसोडे सर(मेंबर),देशमुख सर(मेंबर) यांचे चेहरे हळुहळु क्लिअर व्हायला लागले..."नाव काय आहे?" उत्तर.."शिक्षण?"....उत्तर...नाॅर्मल होवू लागलो...आतुन सावध झालो...आता प्रश्न येणार. आलाच!!! पण माझ्या लिंकचा...लिंकींग मेथड की जय! " तुम्ही छंद वाचन लिहीला आहे, ते ययाती,मृत्युंजय वगैरे सोडून अलिकडचे काय वाचले ते सांगा, तुम्ही सगळे जण ही दोनच पुस्तके वाचता का?" मी" सर, अत्यंत आदरपुर्वक सांगतो ही दोन पुस्तके मी अकरावीला असतानाच वाचली आहेत, सध्या मी " द अल्केमीस्ट" हे पुस्तक वाचले आहे "(मराठीची अनुवादित प्रत बाजारात येवून एक महिन्यापेक्षा कमी कालावधी झाला होता आणी हे खरंच अलिकडचे पुस्तक होते, अरूणभैय्याचे आभार एवढे सुंदर पुस्तक त्यांनी वाचायला आणले होते .) अध्यक्षांनी लगेच प्रश्न केला" त्यातुन आपल्याला काय संदेश मिळतो?" ( लक्षात आले सरांनी पण हे पुस्तक वाचले आहे, जे पुस्तक एवढे आवडले होते आणी भारलेही होते त्या अगदी हृदयात बसलेल्या पुस्तकाबद्दलचा प्रश्न...मग काय मी जणु सॅतिएगो आणी तो प्रश्न म्हणजे शकुन!! मी तेथुन जे उत्तरे द्यायला सुरूवात केली आणी जो आत्मविश्वास आला तो शेवटपर्यंत अगदी सुभेदार गेस्टहाऊसचा परिसर सोडला तरी फाॅर्म कायमच होता...) मी काय संदेश मिळतो ते अगदी सुस्पष्ट सांगीतले, अध्यक्ष उत्तरले"गुड!"मी "धन्यवाद सर" दुसरा प्रश्न "अजुन काय वाचले?" मी " दि गाॅड ऑफ स्माॅल थिंग्ज" त्याच्या लेखिका,त्यांचा पुरस्कार , बिए चे इंग्रजी साहित्य, शेक्सपिअर,त्याची लेखनशैली, त्याची साहित्यकृती,भारतीय इंग्रजी लेखक, त्यांचे वैशिष्ट्य....मुलाखत बहारदार पध्दतीने सुरू होती, सफाईदारपणे उत्तरे देत होतो,कुठलाही किंतु परंतु राहिला नव्हता.. आणी अचानक दुस-या सदस्यांकडे धुरा गेली...मग विषय लोकप्रशासन, व्यवस्थापन त्यातील फरक, व्याख्या, विचारवंत,त्यांचे योगदान अशा विविध बाबींचे प्रश्न विचारले जाऊ लागले. लोकप्रशासन माझा एम ए चा विषय,राज्यसेवेचा ऐच्छिक विषय. एक तर त्यात आवड वरून तो दयानंद काॅलेजच्या प्रा.सुभाष भिंगे सरांच्या तालमीत शिकला असेल तर..मग काय किंतु काय परंतु! सगळं लख्ख, स्वच्छ घडाघडा उत्तरे देत होतो.. मुलाखत समाधानकारकरित्या चालू होती अचानक मॅडमचा प्रश्न "द गाॅड ऑफ स्माल थिंग्ज"ची थीम सांगा,त्यात काय आहे? शेक्सपिअर व अरुंधती रॉय यांची तुलना करा, दोघात कोण श्रेष्ठ आहे? दृष्टीकोन असणारे विश्लेषणात्मक प्रश्न यायला सुरू झाले..अलर्ट!! मानवाधिकार व मुलभुत अधिकार काय फरक आहे? कोणते अधिकार श्रेष्ठ आहेत? तुम्ही कुठल्या अधिकारांना प्राधान्य द्याल?वगैरे इंडियन ऑथर मधे कोण आवडतं? का? फिक्शन लिटरेचर म्हणजे नक्की काय? इत्यादी त्यानंतर शेवटचे सदस्य "लातुर?" मी"हो सर" कधी निर्माण झाला?..या प्रश्ना पासून जे वस्तुनिष्ठ प्रश्न सुरू झाले ते थांबायचे नाव नाही..प्रश्न उत्तर, प्रश्न उत्तर...ते विचारत आहेत मी उत्तर देत आहे..प्रश्न खाली पडतच नव्हता..भुगोल,राज्य घटना, कृषी फक्त विषय बदलत होते..आणी अचानक..."मोगलांची वंशावळ सांगा" एकदम स्पीडब्रेकर....काही केल्या आठवेणा...मी"सारी सर" "मग शिवाजी महाराजांची वंशावळ सांगा " सांगीतली..पुन्हा अध्यक्षांचे प्रश्न सुरू झाले पद, पसंतीक्रम, पदाची कर्तव्य...पसंतीक्रम असाच का दिला..महसुलच्याच पदांना पसंती का? उत्तर देत होतो...सरतेशेवटी अध्यक्ष म्हणाले "ठिक आहे,तुम्ही जाऊ शकता" मी उठून सर्वांना शुभेच्छा दिल्या,आभार व्यक्त करून बाहेर पडलो...थोडासा संभ्रम झाला , आपला इंटरव्ह्यु किती वेळ चालला? माझ्याकडे घड्याळ नव्हते...तर त्याची सोय मित्रांनी केलेली..मी किती वाजता आत गेलो..किती वाजता बाहेर पडलो या वरून त्यांनी समाधानकारक वेळ चालला असा निष्कर्ष काढला.काय काय विचारले , काय उत्तरे दिली याची चर्चा झाली. झांपले सर सिनियर होते म्हणाले "भारी झाला की इंटरव्ह्यु!" पण मला शंका आली म्हटले "सर! किमान अर्धा तास तर चालायला हवा होता फक्त 19 मिनीट म्हणजे कमी झाला ना?:" त्यावर ते म्हणाले " प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळाले तर ते कशाला ताणत बसतील? मळभ दुर झाले......विजयच्या घरी परतलो..झांपले सरांची मुलाखत पण खुप चांगली झाली..एकतर ते ऑलरेडी सिलेक्टेड,त्यात पुर्णतः मॅच्युअर, अनुभवी... त्यामुळे त्यांचा इंटरव्ह्यु चांगला जाणारच यात शंका नव्हती...कारण त्या सोबत त्यांना आम्ही आमचे प्रश्न, अॅगल सांगू सांगू परेशान केलेलेच होते( दिनेशरावचे मोठेपणच!! आम्ही तुलनेने खुप ज्युनियर असूनही त्यांनी आमच्या इनपूटला अत्यंत आदर दिला अर्थात त्यांनी केलेली सुचना तर आम्ही खुप गांभीर्याने घ्यायचो) पण दिनुभाऊ आपल्या अनुभवी आणी व्यवहारी आवाजात म्हणायचे "बघु ! दिला तर एकदाचा इंटरव्ह्यु, पाहू काय होतंय"
आम्ही औरंगाबादहून लातुरला परत आलो. घरी भेटून सगळंयाना सांगीतले मुलाखत चांगली झाली. आई वडिल म्हणाले आता आराम कर थोडा, रहा चार पाच दिवस पण मी म्हटले "विजयचा इंटरव्ह्यु राहिला आहे, मिळुन तयारी करायची आहे" वडील म्हणाले "जा ! स्वतःचा इंटरव्ह्यु आहे तशीच तयारी करा,हयगय करायची नाही " किती सहज बोलले पण त्यांची मनोवृत्ती समजली इमानदारीने मित्रासाठी पण योगदान द्या!! मी लातुरला आलो विजय सोबत बसून रोज तयारी करू लागलो,चर्चा, ऊणिवा, दुरुस्त्या,...एक जाणवले...पुणे सोडून विजय लातूर मधे तयारी करत आहे म्हणजे आपली जबाबदारी जास्त आहे..आम्ही जिव लावून तयारी करू लागलो.विजयचा इंटरव्ह्यु जणू माझाच आहे असे समजून......विजयची तयारी पण मुळातच खुप चांगली होती त्यात काही भर पडेल का? याचाच प्रामाणिक प्रयत्न असायचा आमच्या ग्रुपमध्ये एक वैशिष्ट्य आहे जर एखाद्या गोष्टी बद्दल स्वतः सोडून इतराला खात्री आहे आणी तो त्या बद्दल सांगत आहे तर निर्धास्तपणे त्याच्यावर विश्वास ठेवायचा...विजयच्या इंटरव्ह्युचा दिवस जवळ येत होता. औरंगाबादला विजयला सोबत म्हणून मीही निघालो...त्या काळात कुठल्याच सोबत्यावर कसलेच दडपण येणार नाही याची सामूहिक काळजीच आम्ही घेत होतो...विजयाचा इंटरव्ह्यु जवळपास शेवटच्या दिवसात होता...औरंगाबादचे MPSC चे इंटरव्ह्यु शेड्युल जवळपास संपत आले होते....मनात एक विचार सतत येत होता, सर्व पॅनल मेंबर खुप दिवसांपासून मुलाखती घेत आहेत ते आपल्या प्रश्नात नाविन्य आणतील...सतत जाणवत होते, मी विजयला म्हणालो," मास्तर! काही तरी वेगळ्या सरप्राइजिंग प्रश्नाची पण तयारी ठेवावी लागेल"(मी आणी विजय त्या काळात (आणी आत्ताही कधी कधी )एकमेकांना मास्तर म्हणायचो) विजय पण मुलाखतीच्या या चक्रात जसा उमेदवार ओव्हरलोडेड होतो तसेच झाले होते. पण तरीही विजुने विश्वास दाखवला..मग प्रचलित प्रश्न, नविन प्रश्न, संभाव्य प्रश्न, लिंकींग प्रश्न सर्वत्र आमचा धुंडाळा सुरू होता...जी अवस्था माझी तीच विजयची...काय फरक असणार.....मनात झटपट...
विजयच्या मुलाखतीचा दिवस उगवला ,विजयची तयारी झाली ..आम्ही सुभेदार गेस्टहाऊस कडे निघालो... जातानाही आमची चर्चा सुरू होती. जाण्यापूर्वी काही तरी खायला हवे असे ठरले..माझी बडबड सुरू होती, त्यातुन मी खरंतर मुलाखतीचा दबाव विजयवर येणार नाही याची माझ्यापरीने काळजी घेत होतो.आम्ही नाश्ता करायला थांबलो. का कोण जाणे मी विजयला अचानक म्हटले "आजचा पेपर वाचायला हवा" विजयला शांती हवी होती डोक्यात आता नविन काही नको होतं...त्याचा आदर करत मी म्हटलं ठिक आहे मी वाचतो ! सहज डिस्कस करू! आणी मी पेपर हातात घेवून वाचु लागलो , काही महत्वाच्या बातम्या निवडून आम्ही चर्चा केली. आठवत नाही पण त्यात साखर कारख्यान्या बाबत एक बातमी होती. आम्ही मुलाखत स्थळी गेलो..मग ठरल्या प्रमाणे विजयला आत सोडले.मी बाहेर थांबलो...प्रतिक्षा सुरू होती.विजयची मुलाखत झाली. विजय बाहेर आल्याबरोबर सांगीतले, बरं झालं ! तुम्ही सकाळी पेपर वाचून सांगीतले , मला पॅनलने विचारलेला पहिला प्रश्न होता" आजच्या पेपर मधल्या महत्वाच्या पाच बातम्या सांगा"!!!! आम्ही दोघेही स्तब्ध झालो.आणी अचानक खुश ही ...सगळे हात एकमेकांना सावरायला असतील तर पडण्याची भिती कसली!!! विजयचा इंटरव्ह्यु खुप छान गेला होता. ..सगळ्या मित्रांचा शेवटचा टप्पा सुखद गेला होता..आम्ही लातुरला परतलो.....
सगळे जिवश्च कंठश्च मित्र, आमचे सुख दुःख हेच, हेच आमचे जगणे झाले होते, हीच आमची दैनंदिन. सगळे वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे,परिस्थितीचे..पण अखंड एकजीव..आमच्या ध्येयाने आमच्यातील भेद गाळुन टाकले होते...आता प्रतिक्षा होती फक्त निकालाची...!! पण तो काही लवकर लागत नव्हता, दरम्यान पुढची अॅडव्हर्टाईज आली होती..आम्ही सगळे जुने नवे मित्र पुन्हा अभ्यासाला लागलो..तेच झपाटलेपण..तेच समर्पण...तोच भाव...पण मनात कायम एक आस निकाल कधी लागणार??? काहीच उत्तर नाही दिर्घ प्रतिक्षा.....
मी जरी सगळ्यात होतो तरी आतुन एकटा होतो...जर निकाल नकारात्मक आलाच तर मी कदाचित किती मागे फेकला गेलो असतो..कल्पना ही करवत नव्हती..मनात कायम ते अर्धपडके घर.... आईवडील... आठवत रहायचे....एकदा गावाकडे गेलो...आत साचल्या पण कोणाशीही बोलू न शकणा-या भावना घेवून माळरान गाठले...सांजवेळ..माळरान..गावात लागणारे दिवे...गावाकडे परतण्याची घाई झालेले गुरे...मी मात्र तसाच गावाकडे पाठ करून मुक माळरान तुडवत निघालो.. किती बोललो..किती मुक राहिलो...माळरान ऐकत होतं.......मी त्यावर पेरल्या स्वप्नांच्या बिया फुलतील का? हा प्रश्न मी त्याला विचारला....माळरान हसल्याचा भास झाला......मी पावश्याची पाऊस तगमग मनात घेवून निकाल कसा लागेल याची कल्पना करत होतो........मुक मनात नुसता कल्लोळ सुरू होता....(प्रताप)
(क्रमशः )

No comments:
Post a Comment