Wednesday, October 5, 2022

हिरवे उधाण


माझ्या गगन हाकेवर
उधाण हिरवे येते
शिळ अंतरीची
मग चंद्र चांदणे होते

एक सुबक तारा
हसतो सांडत आभा
हृदयात साठवणुकीची
देत नाजुक मुभा

मन पिसारा होते
सजवत आपली काया
हिरव्या ढगात उमलते
गुलाबी चांदणमाया

नजरेत चमकतो चंद्र
स्मितात मधुच्या धारा
आभास कुशीत मोहरतो
पाहून हसरा तारा....


༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
५.१०. २०२२




No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...