Sunday, October 9, 2022

चंद्रज्योती



चंद्र आला सखे!
उजळत तुझी काया
अंथरली मी ओंजळ
आभा तुझी धाराया

उजळ चंद्रज्योतीतुन
मोतीपवळ्याच्या राशी
तुळसमंजिरी हसते
दिवेलागणी दाराशी

ये! सारेच उजळत असे
तम सोनधुके भासावा
चकोर व्याकुळ होवून
चेह-यास तुझ्या ध्यासावा

शुभ्रधवल ढगाला
जसे लाभले सोने
उजळून दे समग्र
जगण्याचे गडद कोने....

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
९.१०. २०२२




No comments:

Post a Comment

तोडून...?

गोकुळ निघाले मथुरा अनाथ झाल्या गायी राधा हृदय चालले कृष्ण दिशेने पायी येईल परतून कान्हा देईल हाक हासरी? की थेट वृंदावनी मूक्ती तोडून प्राणप्...