Wednesday, October 19, 2022

नकोस....


मी धुसर होऊन असा
गडदाऊ कसे रंग?
ढगास कुठल्या देवू
परतोन्मुख तरंग?

डोंगराची एकट माळ
गाईल गीत कसले?
स्वप्न तुझे शिखराचे येथे
उशास माझ्या बसले

बुडणा-या किरणांचे
कसे गाठू मी मुळ?
की उधळू अवकाशी
थव्यापंखातली धुळ

उजेड हृदयाचा देऊ
की होऊ तमाची छाया?
नकोस पाठवू स्वतःतल्या
स्वतःस मला भेटाया....

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२०.१०. २०२२






No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...