Sunday, October 2, 2022

स्पंदनभुल


सांज अवतरे मृगजळी
थवा घरट्याचा तृष्ण
अशा शामली वेळी
बासरीतुन निवतो कृष्ण

अवकाशी लाली पसरे
आरक्त गोकुळ होतो
गायगळ्याची घंटा
उत्सुक पायरव होतो

निरंजनाचे हृदय
जळून वात उजळते
आभाळावर रवीचे
मन सांय ढवळते

अशा अवघड वेळी
आठवे चांदणझुल
हृदयास माझ्या पडावी
तुझी स्पंदनभुल....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२.१०. २०२२





No comments:

Post a Comment

तोडून...?

गोकुळ निघाले मथुरा अनाथ झाल्या गायी राधा हृदय चालले कृष्ण दिशेने पायी येईल परतून कान्हा देईल हाक हासरी? की थेट वृंदावनी मूक्ती तोडून प्राणप्...