Wednesday, October 5, 2022

जळण्याचे तिलीस्म



कुठल्या परगण्यात
कुठल्या गावा
शोध कसा हा
पुर्ण व्हावा

ह्या फुलाचा असा
कुठला आहे वाण
ॠतु येण्या जाण्याचे
याला न राही भान

चालता अंतर सरते
पाऊल निघत नाही
ही कसली भुल पापण्याला
सहजी बघत नाही

मी विसरत नाही वार
हंगामाचे तुझ्या ओले
ऐन फुलघडीचे माझे
कित्येक बहर गेले

येवून जातो वणवा
सहजी शमत नाही
छंद अरण्यास माझ्या
त्यालाही गमत नाही

ये धडाडून व्यापत
करत सारे भस्म
कळेल तुलाही सुख
अन् जळण्याचे तिलीस्म.....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
५.१०. २०२२








No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...