Friday, October 14, 2022

पाऊस परतीचा


नसतो कधी कधी
पाऊस सखा धरतीचा
मग ढगास होणे होते
पाऊस परतीचा.....

देवून सारे निघतो
नसते कसली घाई
धरती अनूभवताना
नवॠतुची हिरवाई

दरवेळी असाच तो
उसासून सारे देतो
हंगामाच्या शेवटी
तो परका परका होतो

गुमान जातो निर्वाती
पायरव न करता
क्लांत निरभ्र होतो
धरतीची ओटी भरता

येईल हाक फिरूनी
पुढच्या ॠतुच्या घडी
तो पावेतो पाऊस माझा
देईल काळीज दडी

झालाच जिव उष्म
माग कधी तु धारा
मी होईन तुजसाठी
पाऊस बरसणारा........

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१५.१०. २०२२




No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...