Saturday, October 1, 2022

आठवांचे खडाव


गोरजधुळ आसमंती
भेटीचे पाझर ओले
गोठ्यांचे काळीज पान्हा
बासरीचे सुर निघाले

एकांत ग्रहणावेळी
हलकीशी चाहूल भिडते
गोठ्यामागे कोणी
मुक राधा रडते

आठवांचे खडावांना
पाऊल कुणाचे देवू?
हंबरलेल्या हृदयाला
चाहूल कुणाची वाहू?

फुलव संध्यासमयी
माझ्या अंकुराचे पोत
एकल्या जिवास भेटते
तुझ्या आठवांचे गणगोत

मी अंधाराच्या खाली जपतो
चंद्रमुखी फुलांचे ताटवे
या घनघोर एकांत वेळी
चंद्र तुझा बघ आठवे

नकोस देवू अमावस
सोनेरी पुनव राती
तुझ्या प्रकाशबिजासाठी
उत्सुक असता माती....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१.१०. २०२२







No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...