Friday, September 30, 2022

रातीच्या अंधाराचे


अंतरंगातील जाणिवांचे
कसे रूप साकारू?
तु नसल्या पोकळीत
काय असे आकारू?

नसते तुजसम काही
मजला गमत नाही
नुसते भास कितीदा
जिव त्यांच्यात रमत नाही

व्हावे झुळुक लकेरी
तुला स्पर्शुन यावे
हा ही भासच अंधूक
तरीही हर्षून जावे

ये ना कधी दीठीला
आस किती राखावी?
अंधाराच्या भिंतीवर
कितीदा तु रेखावी

आकार साकार दोन्ही नाही
तरीही पुकार चाले
रातीच्या अंधाराचे अगणित
भग्न शिल्प झाले.....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१.१०. २०२२





No comments:

Post a Comment

मुक्तीसंगर!

तूझ्या ओंजळीने भिमा तू आम्हा दिलास सागर महाडाच्या तळ्यातून  तू चेतवला जागर! तूझ्या ओंजळीचे आजही आम्ही पितो रे पाणी पिढ्या हूरूपाने गाती तूझ...