Sunday, September 25, 2022

शब्दनिळ...

मी शब्दनिळ होऊन
सुर राधा छेडले
यमुनेचे पाणी हसरे
नयनी जेंव्हा भिडले

झाड शहारे अवघे
जेथे शाम टेकला
मार्गस्थ होऊनी ठेवी
मागे सुर एकला

राधा काढत माग
वृदांवनी फिरते
ओठांच्या काठावरती
स्तब्ध बासरी झुरते

शाम सुर पेरतो
व्याकुळ आलाप येतो
मंद झुळुक स्पर्शता
राधेशी मिलाफ होतो

हसते राधा एकली
नयनी शाम रडतो
अवकाशाच्या परिघावर
मोरपंख अलगद उडतो...

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२५.०९. २०२२









No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...