Saturday, September 17, 2022

टिंब.



तुझ्या कवितेत
जसा तपशील येतो
अगदी मनाच्या
तळातुन..प्रतिमारुपात
तसा मी ही
यावा कधी स्फुरून
अनाहूत
इतपत
सखोलता
गाठेन का मी?
हा अट्टाहास न ठेवता
मी.....
उतरतो आहे खोल
तुझ्या अंतरी...
तु बस सावरून
तुझे भूर्जपत्र
आणी ठेव टाक सज्ज..
स्फुरलीच एखादी कविता
तर लिहून ही टाक..
नाहीच सुचलं काही
तर काढ
एखाद टिंब...
मी घेईन अदमास
माझाच.....
त्या टिंबातही....



༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१७.०९. २०२२




No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...