Monday, September 19, 2022

उजेडाचे टाहो


बंद दाराच्या बिजागरीस
चाहूल कुणाची वाजवे?
आभाळातल्या चांदण्यावर
मी उधळले मग काजवे

अजूनही जागते रात्र
नक्षत्राची घेवून आस
सप्तर्षी ता-यातुन मजला
चेह-याचा तुझ्या भास

मी काढत माग निघता
रस्त्यास पडे ना भुल
तु अवकाशी खोचलेले
उत्तरेस ध्रुवाचे फुल

मी ओंजळीत झेलून घेतो
एक तुटता तारा
हा क्षण तमाचा दाटे
स्वप्नही न पडणारा

पहाटेला तारा ढळतो
निज तुझी का तुटते?
का त्यामुळेच अवकाशी
उजेडाचे टाहो फुटते?

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१९.०९. २०२२



No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...