Friday, September 2, 2022

शहरात.....


कल्पनेत मी पाहतो
मोठं घड्याळ असणारं
एक इवलसं शहर
त्यातलं तळं
तेथील पाऊलवाटा
तिथली सकाळ
शहरातील मोजकीच
पुस्तकाची दुकानं
शोधूनही न सापडणा-या
मात्र अनाहुत हाती लागतील
अशा चिजवस्तुची बाजारपेठ
मी कल्पनेत पाहतो
इंग्रज कालीन खुणांचे नगरठसे
कधी तु सांगीतलेला लामणदिवा
कधी कधी तेथे पडणारा पाऊस
लख्ख निरभ्र आकाश...
करतोही तु सांगीतल्या स्थळांची,
माणसांची तपशीलवार वर्गवारी
अशा अनोळखी शहरात
राहता ओळखीचा देखणा
हसरा चेहरा आठवत...
मी पाहतो तेथील
फुलांचे झाडांचे घोळके
तेथील झाडाफांद्यावरील
पेंगुळलेले निशाचर पक्षी
तळव्यावर सजलेली
पहिल्या बहराची फुले
सारं सारं मी कल्पनेत पाहतो
मात्र .....
मी मलाच पाहत नाही
अशा काळीजओढ शहरात.......

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
०२.०९. २०२२









No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...