Thursday, September 8, 2022

निनावी मौन



महाकाव्य मजला
सुचते प्राणभाषी
सय मनातली माझ्या
तुजकडे माहेरवाशी

मी गाठतो तळ कशाचा?
हाती काही ना लागे
हे असले कसले क्षण
तुजविन एकले अभागे

मी पिंपळ होऊन उभा
कोण समाधी लावते?
वैशाखाच्या पुनवेला
मन वैरागी धावते

फिरून येते तु
मी ऊंची गाठत नाही
हे कसले अनादी कोडे
सुटता सुटत नाही

लिहावेत ताम्रपट
की शिलालेख कोरावे?
की मौन मी निनावी
या कवितेतुन पेरावे...?


༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
०९.०९. २०२२













No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...