Monday, September 5, 2022

जोजवणारे....


जाहले असे कितीदा
शिल्लक खुप राहते
तुझ्यातले अर्धे काही
अर्ध्यास माझ्या पाहते

होईल कधी पुर्ण हे?
घेवून आस चालतो
उत्तरेचा चांदवा
नभास व्याकुळ बोलतो

कधी नसतेही निघायचे
तरीही आपण निघतो
रातीच्या मध्यावरती मग
शब्दातुन कोण बघतो?

झोप अशी का जागवे?
शिणतील ना पहाटवारे
मिट कुशीत तु डोळे
स्वप्नांना जोजवणारे...

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
०५.०९. २०२२




No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...