Friday, September 9, 2022

मखमली पाश



तुटता तुटत नाहीत
हे पाश तुझे मखमली
जसे आभाळाशी जडते
चांदणे मखमली

विसर पडत नाही
दोघांनाही असते आस
दिवसा उजेडी लुप्त
चांदण्याचा आभाळा भास

रातीत सारे हरते
चांदण्याच्या ठायी
दुरच्या चांदण्याला
माझे आभाळ उतराई

कोण कोणास व्यापते?
प्रश्नास अर्थ नसतो
दोहोचा प्रकाश
तम सारत असतो...




༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१०.०९. २०२२






No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...