Thursday, September 1, 2022

दोन जिव एकाकी



माझ्या खुणा पुस
आठवणी निर्वंश कर
तुटल्या काळिजमण्याची
सावली तगमगीवर धर

होतील किलबिले
न लागत्या चाहूलीचे
मी पुसेन अंधूक माग
जिवाच्या काहिलीचे

तु कशास वाहते पाणी
नयनांच्या काठावरूनी
हा पक्षी थेंब टिपतो
एकाकी वाटावरूनी

नकोस गाऊ उदासे
काळीजखुणा बघ भिजल्या
मज खुणावत्या वाटेवरती
सांजी ही विरक्त विझल्या

नकोस उदास होऊ
अंतर नाही पडले
दुर चकाकते चांदणे
बघ आभाळाला भिडले

होऊन एकरूप दोघे
प्रकाश उजळ वाहती
दोन जिव एकाकी
त्यांना अंतरात पाहती....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
०१.०९. २०२२










No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...